शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मग, २०२२ च्या निवडणुकीत इर्षा होणार नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत इर्षा वाढते, त्यातून सामान्य उमेदवारांचे नुकसान होते, म्हणून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत इर्षा वाढते, त्यातून सामान्य उमेदवारांचे नुकसान होते, म्हणून राज्य शासनाने या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय घेतला. मात्र पुढील टप्प्यात २०२२ ला होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी आताच सरपंच आरक्षण का काढले? त्यावेळी इर्षा, पैशांची उधळपट्टी होणार नाही का? अशी हरकत सांगरूळचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव खाडे यांनी करवीर तहसीलदारांकडे घेतली आहे.

ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण हे पाच वर्षातून एकदाच काढले जाते. निवडणूका तीन टप्यात घेतल्या जात असल्या तरी निवडणुकीपूर्वी आरक्षण काढले जाते. या टप्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या, तत्पुर्वी जिल्ह्यातील सर्वच १०२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणाची सोडत होणार होती. मात्र राज्यशासनाने ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच आरक्षण पडलेल्या प्रभागात इर्षा निर्माण होऊन त्यातून पैशांचा वारेमाप खर्च होऊन सामान्य उमेदवार टिकू शकत नाही, त्यामुळे निवडणूकीनंतर आरक्षण सोडतीचा निर्णय घेतला. मात्र बुधवारी सगळ्याच १०२५ ग्रामपंचायतीसाठी सोडत काढण्यात आली. करवीर तालुक्यातील हरकती वेळी सांगरूळचे सरपंच सदाशिव खाडे यांनी याच मुद्यावर तहसीलदार शितल मुळे-भामरे यांच्याकडे हरकत घेतली. मात्र हा विषय जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवरील असल्याने त्यांच्याकडे तक्रार करण्यास मुळे-भामरे यांनी सांगितले.

कोट-

निवडणूकीतील इर्षा कमी होऊन निकोप प्रक्रिया पार पडावी, यासाठी शासनाने निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण सोडत घेतली. मग २०२२ ला होणाऱ्या ग्रामपंचायतीवर अन्याय का? याबाबत प्रशासनाने खुलासा करणे अपेक्षित आहे.

- सदाशिव खाडे (लोकनियुक्त सरपंच, सांगरूळ)