वीज कनेक्शन तोडल्यास महावितरणला हिसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST2021-01-21T04:23:18+5:302021-01-21T04:23:18+5:30

कोल्हापूर : वीज बिल भरले नाही म्हणून कनेक्शन तोडायला आलेल्या महावितरणला येथून पुढे कोल्हापुरी हिसकाच दाखविला जाईल, असा ...

Snatch MSEDCL if power connection is cut off | वीज कनेक्शन तोडल्यास महावितरणला हिसका

वीज कनेक्शन तोडल्यास महावितरणला हिसका

कोल्हापूर : वीज बिल भरले नाही म्हणून कनेक्शन तोडायला आलेल्या महावितरणला येथून पुढे कोल्हापुरी हिसकाच दाखविला जाईल, असा निर्धार वीज बिल भरणार नाही कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला.

थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणने आक्रमकइ? भूमिका घेत बिले न भरणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन तोडले जाईल, अशी भूमिका घेतली आहे. एका बाजूला मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक असताना महावितरणने घेतलेल्या भूमिकेमुळे संतापलेल्या कृती समितीने बुधवारी संध्याकाळी तातडीने विठ्ठल मंदिरात बैठक घेऊन बिल अजिबात भरणार नाही, लॉकडाऊन काळातील बिलांची माफी झालीच पाहिजे, नोव्हेबर नंतरचीच बिले भरली जातील यावर ठाम असून, महावितरणने दादागिरी केल्यास आम्हीही गय करणार नाही, जनक्षाेभ उसळल्यास त्याला जबाबदार राहणार नाही असे कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी सांगितले. बाबा इंदूलकर, बाबा पार्टे यांनीही मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांनी वीज बिल माफीचा शब्द दिलेला असतानाही त्यांनी तो पाळलेला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत येथून पुढे आक्रमक? आंदोलन करू असा इशारा दिला.

यावेळ अनिल घाटगे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, अशोक भंडारी यांच्यासह सर्वपक्षीय नागरिकांनी सहभाग घेतला.

Web Title: Snatch MSEDCL if power connection is cut off