शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जांभळीमध्ये २८ प्रकारच्या फुलपाखरांचा वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST

* जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम यड्राव : जांभळी (ता. शिरोळ) येथे बिग बटरफ्लाय मंथनिमित्त आॅक्सिजन पार्कवर ‘बटरफ्लाय वॉक’चे आयोजन केले ...

* जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम

यड्राव : जांभळी (ता. शिरोळ) येथे बिग बटरफ्लाय मंथनिमित्त आॅक्सिजन पार्कवर ‘बटरफ्लाय वॉक’चे आयोजन केले होते. यामध्ये २८ प्रकारच्या फुलपाखरांची ओळख पटविण्यात आली. जिल्ह्यातील पहिल्याच उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फुलपाखरांच्या जीवनचक्राची सविस्तर माहिती फुलपाखरू अभ्यासक डॉ. संतोष उमराणे व सर्वदमन कुलकर्णी यांनी करून दिली.

देशात गेल्या वर्षीपासून सप्टेंबर महिना बिग बटरफ्लाय मंथ म्हणून साजरा केला जातो. यामध्ये फुलपाखरांचे जीवनचक्राच्या प्रवासाची संपूर्ण माहिती घेऊन त्यांचे विश्व उलगडण्याचा प्रयत्न केला जातो. लोकांच्या मनात फुलपाखरे आणि पर्यावरण याविषयी जागृती व्हावी, शास्त्रीय पद्धतीचा वापर करून फुलपाखरांच्या नोंदी करणे आणि त्यांची माहिती संकेतस्थळावर नोंदवणे, जेणेकरून देशातील सर्व माहिती एकाच ठिकाणी नोंदवली जाऊन माहितीकोश तयार होईल आणि भारतातील जैवविविधतेची जपणूक करता येईल, या उद्देशाने जांभळी गावात बटरफ्लाय वॉकच्या माध्यमातून अभ्यास करण्यात आला.

जिल्ह्यात यंदा पहिल्यांदाच असा उपक्रम घेण्यात आला. लहान मुलांसह सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला. या उपक्रमामुळे झाड आणि फुलपाखरांचे जीवनचक्र यांच्या समन्वयातून अभ्यास सर्वांना करता आला. रंगीबेरंगी फुलपाखरू पाहून बटरफ्लाय वॉक चांगलेच मनमोहक झाले.

भिरभिरणाऱ्या फुलपाखरांची ओळख करून घेताना सर्वजण भारावून गेले. पर्यावरण लेखिका व अभ्यासक चित्कला कुलकर्णी, डॉ. ज्योती बडे, डॉ. शैला कुंभार यांचे मार्गदर्शन बटरफ्लाय वॉकमध्ये उपयुक्त ठरले.

या वेळी डॉ. दशावतार बडे, ऋतिक बडे, देविका बडे, जितेंद्र शिंदे, सलमान कुडचे, आकाश यादव, बाळकृष्ण शिंदे, विनायक भुयेकर, यासीन देसाई, संदीप पाटील, संदीप बिरंजे, अर्जुन मोरे, विनायक कोळी, भगतसिंग गायकवाड, स्वाती ऐनापुरे आदी उपस्थित होते.

फोटो - २००९२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - जांभळी (ता. शिरोळ) येथील आॅक्सिजन पार्कवर फुलपाखरांची ओळख अभ्यासक डॉ. संतोष उमराणे व सर्वदमन कुलकर्णी यांनी करुन दिली.