शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत सहा फ्लॅट फोडले

By admin | Updated: June 16, 2015 01:14 IST

चोरट्यांचा धुमाकूळ : २० तोळे सोने, पावणेतीन लाख रोकड लंपास; पोलीस सुस्तच

सावंतवाडी : सावंतवाडी शहर आणि परिसरात चोरांनी धुमाकूळ घातला. शहरात रविवारी रात्री सलग दुसऱ्या दिवशीही सहा ठिकाणी चोऱ्या झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. शनिवारी मध्यरात्री तीन दुकाने फोडून ८० हजारांचा माल लंपास केला होता. मात्र, रविवारी रात्री चोरट्यांनी २० तोळे सोने व रोख दोन लाख ७६ हजार रुपये, असा एकूण नऊ लाख रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. या दोन्ही चोरीप्रकरणी शहर पोलीस मात्र सुस्तच असून, एकाही चोरट्यास अटक केलेले नाही. खासकीलवाडा परिसरातील जोग संकुल सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील दत्ताराम बाबाजी शेडगे यांचा बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडला. येथून २० तोळे सोने व लग्नासाठी आलेला आहेरही चोरट्यांनी पळविला. दत्ताराम शेडगे यांच्या मुलींचे लग्न ११ जूनला झाले होते. लग्नाचा सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर शेडगे कुटुंब आपल्या मूळगावी शिवापूर येथे काही दिवस राहण्यासाठी गेले होते. चोरट्यांनी या संधीचा फायदा घेऊन शेडगे यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडले व घरात प्रवेश केला. घरातील दागिने व लग्नात आलेला आहेरही चोरट्यांनी पळविला. या चोरीपूर्वी शेजारील फ्लॅटना चोरट्यांनी बाहेरून कडी लावली असल्याचे एका शेजाऱ्याने सांगितले. याच अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅटमध्ये रविवारी रात्री दोन वाजेपर्यंत धार्मिक कार्यक्रम चालू होता. यामुळे या परिसरात लोकांची वर्दळ होती. चोरट्यांनी याच अपार्टमेंटमधील एस. तोरणे यांचा बंद फ्लॅटही फोडला होता. यानंतर मात्र चोरट्यांचा मोर्चा न्यू खासकीलवाड्याकडे वळला. येथील पांडुरंग भिमू भुसानवार यांच्या बंद खोलीतून रोखरक्कम दोन लाख २६ हजार रुपये व तीन हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. भुसानवार हे रात्री उशिरापर्यंत आपल्या दुकान बिलांचे कामकाज करीत असल्याने त्यांच्या खोलीला कुलूप होते. या खोली शेजारीच त्यांचे कुटुंब राहते. काही भाडेकरूही राहतात; पण चोरीचा त्यांना मागमूसही नव्हता. भुसानवार हे रात्री उशिरा घरी परतले व झोपी गेले. सकाळी त्यांना घराच्या शेजारील खोलीचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. न्यू खासकीलवाडा परिसरातच साई दीपदर्शन नावाचे अपार्टमेंट आहे. येथे आठ फ्लॅट असून, जे फ्लॅट बंद होते तेच फ्लॅट चोरट्यांनी फोडले. यामध्ये प्रभाकर आराबेकर (मुंबई), अमृता अविनाश सावंत (कोल्हापूर) व उदय नाईक (सावंतवाडी) यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. याच परिसरातील आरेकर कॉलनीत चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला; पण तो असफल झाला. येथील डॉ. प्रदीप शामराव पाटील हे कामानिमित्त गोव्याला गेले होते. त्यांच्या बंद खोलीचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातली सर्व सामान अस्ताव्यस्त करून चोरीचा प्रयत्न केला; पण येथेही त्यांना काही सापडले नाही. विशेष म्हणजे याच कपाटातील आतील कप्प्यात रोख दहा हजार रुपये व काही सोन्याचा ऐवज होता, तो चोरट्यांच्या निर्देशनास आला नाही. श्वान घुटमळले या घटनेची माहिती सकाळी पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित देसाई हे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला. यानंतर श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वानाने जोग संकुल सोसायटीपासून न्यू खासकीवाडापर्यंत मार्ग दाखवून तेथेच घुटमळत राहिला. या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार करीत आहेत. नऊ लाखांचा मुद्देमाल रविवारी रात्री झालेल्या या चोरीत २० तोळे सोने व दोन लाख ७६ हजार रुपयांची रोकड, असा एकूण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)