शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सहा दिवसांचा जीवघेणा संघर्ष

By admin | Updated: December 9, 2014 00:29 IST

जंगलात वाट चुकलेल्या कडगावच्या महिलेची जिद्द

कडगाव : सभोवती घनदाट जंगल, हिंस्त्र प्राण्यांचा वावर, मुलांना भेटण्यासाठी रस्ता सापडेल या आशेने दिवसभर चालायचे, सायंकाळ झाली की पुन्हा झुडपात अथवा कड्याकपारीत जीव मुठीत घेवून कशीबशी रात्र ढकलायची, आपल्या चिमुरड्यांना भेटण्यासाठी अनवाणी आणि उपाशीपोटी तिने सलग पाच दिवस जीवघेणा संघर्ष केला. जगण्याची आस संपलेल्या सिल्वीयाला सहाव्या दिवशी गुराखी दिसला आणि जिवाच्या आकांताने तिने आरडाओरडा केल्यामुळे तिची जंगलातून सुटका झाली. ही थरारक कहानी आहे कडगाव (ता. भुदरगड) येथील सिल्वीया झेविअर डिसोजा या ३६ वर्षीय महिलेची. संत फ्रान्सिस झेविअरच्या दर्शनासाठी कडगाव येथून सिल्वीया तिच्या पती आणि अन्य बांधवांबरोबर गोव्याला पायी निघाली होती. २९ नोव्हेंबरला डेळेमार्गे जंगलातून जाताना सिल्वीया वाट चुकली होती. सलग चार दिवस शोध घेवूनही न सापडल्याने सर्वजण हताश झाले होते.दरम्यान, गवाणीच्या जंगलात वाट चुकलेली सिल्वीया चालत चालत आजरा, भुदरगड व सावंतवाडी या तीन तालुक्यांत पसरलेल्या गंगोत्रीच्या जंगलात पोहोचली. दिवस उगवला की घरी पोहोचण्यासाठी तिची पायपीट सुरु व्हायची. यावेळी तिच्याकडे फक्त पाण्याची बाटली होतीे. दररोज उपाशीपोटी, अनवाणी ४० ते ५० किलोमीटरची पायपीट करताना तिची दमछाक व्हायची, मात्र चिमुरड्यांच्या भेटीची आस तिला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे थकलेली पावले दुसऱ्या दिवशी पुन्हा 'जिकडे पुढा तिकडे मुलुख थोडा' करायची.मनातून पुरती हरलेली सिल्वीया सहाव्या दिवशी पहाटे पठारावर बसलेली दिसून आली. यावेळी तिने एका गुराख्याला पाहिले आणि तिच्या आशा पल्लवीत झाल्या. जिवाच्या आकांताने तिने ‘वाचवा.. वाचवा..ऽऽ’ अशी आर्त विनवणी केली. त्यामुळे खोतवाडी येथील पांडुरंग वरगीकर यांनी वाडीतील अन्य लोकांच्या मदतीने तिला विष्णू खोत यांच्या घरी नेले. हे वृत्त कडगाव येथील लोकांना समजताच त्यांनी साखर वाटून, फटाका वाजवून आनंद व्यक्त केला. तब्बल सहा दिवसांनी घरी परतलेल्या सिल्वीयाने आपल्या चिमुरड्यांना कुशीत घेत डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. (वार्ताहर)पाण्याचाच आधारहिंस्त्र प्राण्यांची भीती आणि त्यातच गव्यांनी दिलेले दर्शन यामुळे ती मनातून पुरती खचली होती. अशावेळी ती झाडा-झुडपांचा आधार घेत असे. सलग चार दिवस केवळ पोटभर पाणी पिणारी सिल्वीया जगण्याची आस संपल्यामुळे पाचव्या दिवशी, तर पुरतीच सैरभैर झाली होती.