साडेसहा हजार मिळकती अवैध, घरफाळा आकारणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:40+5:302021-01-20T04:25:40+5:30

कोल्हापूर : महापालिकेच्या घरफाळा विभागातील घोटाळ्याची चौकशी अद्याप पूर्ण व्हायची असतानाच या विभागातील आणखी एक गंभीर प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास ...

Six and a half thousand incomes are illegal, not even house tax | साडेसहा हजार मिळकती अवैध, घरफाळा आकारणीच नाही

साडेसहा हजार मिळकती अवैध, घरफाळा आकारणीच नाही

कोल्हापूर : महापालिकेच्या घरफाळा विभागातील घोटाळ्याची चौकशी अद्याप पूर्ण व्हायची असतानाच या विभागातील आणखी एक गंभीर प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आला आहे. शहरातील सुमारे साडेसहा हजार मिळकती या ‘इनव्हॅलिड’(अवैध) दाखविल्या असून मिळकतींची संख्या हजारोंच्या घरात असूनही त्यावर घरफाळा आकारणीच नाही.

या मिळकती २०१२ पासून ‘इनव्हॅलिड’ म्हणून दर्शविल्या जात आहेत. त्या मिळकती ‘इनव्हॅलिड’ दर्शविण्यामागील कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

या मिळकती नेमक्या कोणाच्या, इनव्हॅलिड दर्शविण्यामागील नेमका हेतू काय, कोणाच्या सांगण्यावरून त्या इनव्हॅलिड म्हणून नोंद झाल्या या साऱ्या प्रकरणाचा महापालिका प्रशासनाला तपास करावा लागणार आहे. यामध्ये महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयातील कार्यक्षेत्रातील मिळकतींचा समावेश आहे. या मिळकती इनव्हॅलिड म्हणून दाखविल्यामुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

महापालिकेत गेले काही महिने घरफाळा विभागातील घोटाळा गाजत आहे. प्रशासनामार्फत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. काही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. प्रशासनाकडून घरफाळा विभागासंदर्भात झालेल्या तक्रारी, घरफाळ्याच्या रकमेतील तफावत या साऱ्या बाबींचा बारकाईने तपास सुरू आहे. महापालिकेचे प्रशासक, उपायुक्त, सहायक आयुक्त हे अधिकारी या साऱ्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. आता इनव्हॅलिड मिळकतीचा नवा विषय समोर आला आहे.

-शास्तीची रक्कम बिलात दिसते, सिस्टिमला नाही-

अनधिकृत बांधकामावर दंडात्मक कारवाई होते त्याला शास्ती म्हणतात. सुमारे ३ कोटी रुपयांच्या शास्तीच्या रकमेचा विषय आहे. शास्तीची ही रक्कम मिळकतधारकांच्या बिलात दिसते, पण सिस्टिममध्ये दिसत नाही. प्रशासनाने या प्रकरणाचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Six and a half thousand incomes are illegal, not even house tax