Kolhapur: एसआयटीच्या प्रमुखपदी रामदास इंगवले, बेपत्ता माजी सरपंच पिळणकर यांचा पुन्हा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:31 IST2026-03-11T11:30:05+5:302026-03-11T11:31:04+5:30

आठजणांची एसआयटी 

SIT formed to search for former Sarpanch Mahesh Dinkar Pilankar of Patgaon Deputy Superintendent of Police Ramdas Ingavale appointed | Kolhapur: एसआयटीच्या प्रमुखपदी रामदास इंगवले, बेपत्ता माजी सरपंच पिळणकर यांचा पुन्हा शोध

Kolhapur: एसआयटीच्या प्रमुखपदी रामदास इंगवले, बेपत्ता माजी सरपंच पिळणकर यांचा पुन्हा शोध

कोल्हापूर : पाटगाव (ता. भुदरगड) येथील माजी सरपंच महेश दिनकर पिळणकर यांचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी एसआयटीची स्थापना केली. गडहिंग्लज उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले यांची एसआयटीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली असून, आठजणांच्या स्वतंत्र तपास पथकाने बेपत्ता पिळणकर यांचा कसून शोध घ्यावा, असा आदेश अधीक्षक योगेश कुमार यांनी दिला आहे.

उपअधीक्षक इंगवले यांच्यासह गडहिंग्लज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर, भुदरगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोरख चौधरी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, सायबरचे उपनिरीक्षक अतिश म्हेत्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील हवालदार राम कोळी आणि कॉन्स्टेबल राजू कोरे यांची एसआयटीमध्ये नियुक्ती केली आहे. 

सात जानेवारी २०२६ पासून बेपत्ता असलेले माजी सरपंच पिळणकर यांचा शोध घेण्याची जबाबदारी एसआयटीवर दिली आहे. गडहिंग्लज उपविभागाचे अपर पोलिस अधीक्षक तपासाचे पर्यवेक्षण करणार आहेत. वेळोवेळी तपासाचा अहवाल सादर करण्याचा आदेश पोलिस अधीक्षकांनी एसआयटीला दिला आहे. एसआयटीमुळे बेपत्ता पिळणकर यांचा शोध गतिमान होईल, अशी अपेक्षा त्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली.

Web Title : कोल्हापुर: लापता पूर्व सरपंच पिलणकर को ढूंढने के लिए एसआईटी गठित

Web Summary : कोल्हापुर पुलिस ने रामदास इंगवले के नेतृत्व में एक विशेष जांच दल (एसआईटी) का गठन किया है ताकि 7 जनवरी, 2026 से लापता पाटगांव के पूर्व सरपंच महेश पिलणकर का पता लगाया जा सके। एसआईटी में आठ अधिकारी शामिल हैं और इसका पर्यवेक्षण अतिरिक्त पुलिस अधीक्षक, गडहिंग्लज कर रहे हैं।

Web Title : Kolhapur: SIT Formed to Find Missing Ex-Sarpanch Pilankar Again

Web Summary : Kolhapur police formed a Special Investigation Team (SIT) headed by Ramdas Ingwale to locate Mahesh Pilankar, former Sarpanch of Patgaon, missing since January 7, 2026. The SIT includes eight officers and is supervised by the Additional Superintendent of Police, Gadhinglaj.