सिंगलसाठी सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST2021-02-10T04:23:07+5:302021-02-10T04:23:07+5:30
गडहिंग्लज : बसर्गे येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आले. नूतन ग्रा.पं. सदस्या भारती रायमाने यांच्याहस्ते ...

सिंगलसाठी सिंगलसाठी
गडहिंग्लज : बसर्गे येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आले. नूतन ग्रा.पं. सदस्या भारती रायमाने यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी सुनील भुईंबर, शिवानंद घस्ती, सारिका घस्ती, शकुंतला घस्ती, निरंजन घस्ती आदी उपस्थित होते.
---------------------------
२) चंदगडमध्ये कोरोना ् सत्कार
चंदगड : कोरोना काळात सामाजिक योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, इतर संघ व एजन्सींचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा प्राची काणेकर होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नगरसेवक अभिजित गुरबे, दिलीप चंदगडकर, मेहताब नाईक, संजना कोकरेकर, विजय कडूकर, नूरजहाँ नाईकवाडी, संजय चंदगडकर आदी उपस्थित होते.
---------------------------
३) कित्तूरकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत
गडहिंग्लज : शहरातील रावसाहेबअण्णा कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाहू कारखाना अध्यक्ष समरजित घाटगे, संस्था कार्याध्यक्ष सतीश घाळी, उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, प्राचार्य व्ही. एम. चौगुले, अमित कुलकर्णी, संकेत बेल्लद आदी उपस्थित होते.
-------------------------
४) चंदगड बांधकाम कामगार असोसिएशनला नोंदणीपत्र
चंदगड : चंदगड तालुका बांधकाम कामगार असोसिएशनला शासकीय मान्यता मिळाली आहे. सहायक धर्मादाय आयुक्त आर. डी. वाबळे व अॅड. महेश खांडेकर यांच्याहस्ते अध्यक्ष कल्लाप्पा निवगिरे यांच्याकडे नोंदणीपत्र देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष बाबू चौगुले, सचिव मोहन चौगले, खजिनदार उमाजी पवार, रघुनाथ पाटील, मारुती कांबळे, आदी उपस्थित होते.
-------------------------
५) सृष्टी रेडेकरचे मैदानी स्पर्धेत यश
नेसरी : नेसरी येथील एस. एस. हायस्कूल व छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची धावपटू सृष्टी रेडेकर हिने पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत १५०० मीटर धावणे व क्रॉसकंट्री क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तिची आसाम व पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. तिला क्रीडाशिक्षक व्ही. बी. आबीटकर यांचे मार्गदर्शन लाभले.
-------------------------
६) मूकबधिर विद्यार्थ्यांना फळे वाटप
गडहिंग्लज : गिजवणे येथील साई निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना जागतिक फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी फळे व वह्यांचे वितरण केले. यावेळी मुख्याध्यापिका सरिता रजपूत, पवन बुगडे, रविकिरण म्हेत्री, सनी तोडकर, ऋतिक लोहार आदी उपस्थित होते.
-------------------------
७) आजऱ्यात भाजपाचे आज बुथ संपर्क अभियान
आजरा : आजरा तालुका ‘भाजपा’तर्फे बुधवारी (१०) दुपारी ३ वाजता श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात बुथ संपर्क अभियान व नूतन ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आजी-माजी तालुका पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांचा मेळावाही होणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी दिली.