सिंगलसाठी सिंगलसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST2021-04-28T04:24:37+5:302021-04-28T04:24:37+5:30

गडहिंग्लज : कार्वे (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री सातेरीदेवी मंदिराची ४ ते ९ मे अखेर आयोजित करण्यात आलेली मूर्ती ...

For singles for singles | सिंगलसाठी सिंगलसाठी

सिंगलसाठी सिंगलसाठी

गडहिंग्लज : कार्वे (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री सातेरीदेवी मंदिराची ४ ते ९ मे अखेर आयोजित करण्यात आलेली मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण आदी धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती ग्रामपंचायतीने दिली.

-----------------------

२) ‘संत गजानन’मध्ये ऋतुजा देसाई प्रथम

गडहिंग्लज : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज पॉलिटेक्निकचा हिवाळी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत ऋतुजा देसाई हिने ९९.६२ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला.

इलेक्ट्रिकल विभागात सादिया पठाण ९८.५०, सानिका शिंगटे ९७.८८ टक्के.

कॉम्प्युटर विभागात विनायक मुरूडेकर याने ९८.३३ टक्के, सिव्हिल विभागात श्रद्धा पट्टणशेट्टी ९७.४३, आकांक्षा गणपती पाटील ९७.२० टक्के,

प्रथम वर्ष कॉम्प्युटर विभागात नेहा कुलकर्णी ९७. टक्के तर द्वितीय वर्षात विवेक चौगुले ९४.८० यांनी यश मिळविले.

यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब चव्हाण, विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. बाळासाहेब चव्हाण यांचे प्रोत्साहन तर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: For singles for singles