सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST2021-02-10T04:23:10+5:302021-02-10T04:23:10+5:30
पेरणोली : पेरणोली व वेळवट्टी (ता. आजरा) येथे आमचं गाव..आमचा विकास कार्यशाळा पार पडली. अध्यक्षस्थानी सरपंच उषा जाधव होत्या. ...

सिंगलसाठी
पेरणोली : पेरणोली व वेळवट्टी (ता. आजरा) येथे आमचं गाव..आमचा विकास कार्यशाळा पार पडली. अध्यक्षस्थानी सरपंच उषा जाधव होत्या. गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांनी १४ व्या वित्त आयोगाचा आराखडा तयार करणे व गावच्या विकासासाठी विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी उपसरपंच उत्तम देसाई यांच्यासह वेळवट्टी, साळगाव, हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव, सुलगाव, मसोली, हाळोली, दाभिल येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक उपस्थित होते.
--------------------------------------------
२) दिव्यांग लोकांसाठी ऑटो रिक्षाचे उद्घाटन
गडहिंग्लज : दिव्यांगांना कोठेही सहजपणे प्रवास करता यावा, यासाठी येथील शिवसेनेतर्फे अॉटोरिक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहसंपर्क प्रमुख सुनील शिंत्रे, शाखाप्रमुख हालाप्पा भमानगोळ, तालुकाप्रमुख दिलीप माने, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रतीक क्षीरसागर, अवधूत पाटील, दयानंद पाटील, बाबू नाईक, महादेव नाईक आदी उपस्थित होते.