शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत कोविड केअर सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:23 IST

पालिकेला घरचा आहेर इचलकरंजी : शहर, परिसरात कोरोनाचे संकट वाढून रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी कोविड केअर ...

पालिकेला घरचा आहेर

इचलकरंजी : शहर, परिसरात कोरोनाचे संकट वाढून रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी कोविड केअर सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे व्यंकटेश्‍वरा हायस्कूल आणि तात्यासाहेब मुसळे कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने औषध पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आरोग्य सभापती संजय केंगार यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करून नगरपालिकेला घरचा आहेर दिला आहे.

पत्रात, शहर परिसरात दैनंदिन रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. शहरातील रुग्णसंख्या पाहता पुरवठा होणार्‍या औषधांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने रुग्णांना औषध बाहेरील मेडिकलमधून आणण्यास सांगितले जात आहे. ही औषधे महागडी असल्याने रुग्णांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. उपचार घेणारे रुग्ण हे इचलकरंजीतील कामगार वर्गातील असल्याने औषधे खरेदी करताना त्यांना आर्थिक अडचण येते. त्यामुळे शहरातील कोविड केअर सेंटरना तातडीने आवश्यक त्या औषधांचा पुरवठा नगरपरिषदेमार्फत होण्यासाठी तत्पर कार्यवाही करण्यात यावी, असे केंगार यांनी म्हटले आहे. वास्तविक नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी व आरोग्य सभापती यांनी दररोज कोविड केंद्रांचा आढावा घेणे आवश्यक आहे. तेथील अडचणी सोडविणे गरजेचे आहे. असे असताना तिकडे दुर्लक्ष होत असल्याने सभापती यांना लेखी पत्र देऊन मागणी करावी लागते. हा घरचा आहेर असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.