संक्षिप्त वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:18 IST2021-06-05T04:18:45+5:302021-06-05T04:18:45+5:30

कोल्हापूर : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूर, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना २ ...

Short story | संक्षिप्त वृत्त

संक्षिप्त वृत्त

कोल्हापूर : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूर, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना २ एकर बागायत किंवा ४ एकर जिराईत खासगी जमीन खरेदी करून १०० टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येत आहे, अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे.

या नागरिकांचे उत्पन्नाचे स्रोत वाढावे व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा, कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन मिळावे, यासाठी ही योजना राबवली जात आहे.

---

खेल पुरस्कारासाठी २१ जूनपर्यंत अर्ज

कोल्हापूर : सन २०२१ साठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, मौलाना अब्दुल कलाम ट्रॉफी (विद्यापीठासाठी) पुरस्कारासाठी २१ जूनपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाने केले आहे.

अर्जदारांनी कोणत्याही विभागाची व्यक्तीची शिफारस न घेता थेट केंद्र शासनाच्या sruendra.yadav@nic.in किंवा gimish.kumar@nic.in या ईमेलवर अर्ज सादर करावे. केंद्र शासनाच्या विविध पुरस्कारांसाठी सविस्तर माहिती, नियमावली विहित नमुना अर्ज https//yas.nic.in/spotrs या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Web Title: Short story