संक्षिप्त वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:25 IST2021-04-22T04:25:16+5:302021-04-22T04:25:16+5:30

कोल्हापूर : येथील कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या अध्यक्षपदी आनंद पाटील व उपाध्यक्षपदी मोहन साळोखे यांची निवड करण्यात आली. ...

Short story | संक्षिप्त वृत्त

संक्षिप्त वृत्त

कोल्हापूर : येथील कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या अध्यक्षपदी आनंद पाटील व उपाध्यक्षपदी मोहन साळोखे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आला.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे कार्याध्यक्ष : दीपक जाधव, सरचिटणीस : तानाजी चव्हाण, दयानंद घबाडे, खजानिस : आनंदराव पाटील. यावेळी ज्येष्ठ संचालक सुभाष जाधव, अच्युत साळोखे, युवराज मोळे उपस्थित होते.

--

फोटो नं २१०४२०२१-कोल-आनंद पाटील (निवड), मोहन साळोखे (निवड)

--

कचरा विलगीकरण केंद्र उभारा

कोल्हापूर : शहरात सुका कचरा विलगीकरण केंद्र त्वरित उभारावे, ते कचरा वेचकांच्या बचत गटांना चालवण्यास द्यावे, अशी मागणी अवनि संस्थेने केली आहे. याबाबतचे निवेदन महापालिका प्रशासनाला देण्यात आले.

कचरा वेचकांना महापालिकेतर्फे ओळखपत्र देण्यात यावे, कचरा वेचकांना कचरा विलगीकरणाच्या कामात सहभागी करून घ्यावे, कचरा वेचकांचा सर्व्हे करावा त्यांना जीवनावश्यक वस्तू द्याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

---

Web Title: Short story