शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; चौघांना अटक, एक अल्पवयीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:20 IST2021-01-15T04:20:08+5:302021-01-15T04:20:08+5:30

सागर वसंत टिपुगडे (वय २३, रा. जवाहरनगर), राजेश मोहन सोनार (२२, रा. कबनूर, ता. हातकणंगले), आकाश केशव माळी (३०) ...

Shivajinagar police action; Four arrested, one minor | शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; चौघांना अटक, एक अल्पवयीन

शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; चौघांना अटक, एक अल्पवयीन

सागर वसंत टिपुगडे (वय २३, रा. जवाहरनगर), राजेश मोहन सोनार (२२, रा. कबनूर, ता. हातकणंगले), आकाश केशव माळी (३०) व पांडुरंग लक्ष्मण सोनटक्के (४८, दोघे, रा. गोसावी गल्ली, इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सागर टिपुगडे व एक अल्पवयीनाने जवाहरनगर येथील एका घराचे कुलूप तोडून सोन्याची बोरमाळ व मोबाईल असा २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. राजेश सोनार याने कबनूर (ता. हातकणंगले) येथील एका घरातील उघड्या दरवाजातून आत प्रवेश करीत सुमारे ५० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला होता. तसेच शाहू हायस्कूलजवळ एकास किरकोळ कारणावरून मारहाण करून पाच हजार ५०० रुपये, एटीएम व आधारकार्ड आकाश माळी व पांडुरंग सोनटक्के यांनी त्याच्याकडून हिसकावून घेऊन पोबारा केला होता. या चौघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विविध तक्रारी दाखल आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रमोद मगर, उदय पाटील, रफिक पाथरवट, गजानन बरगाले, प्रकाश कांबळे, महेश पाटील, अविनाश भोसले व विजय माळवदे यांनी केली.

Web Title: Shivajinagar police action; Four arrested, one minor