शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
2
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
3
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
4
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
5
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
6
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
7
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
8
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
9
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
10
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
11
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
12
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
13
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
14
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
15
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
16
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
19
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
20
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाचा मंगळवारी ऑनलाईन दीक्षांत सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कोनारोच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शिवाजी विद्यापीठाचा यंदाचा ५७ वा दीक्षांत सोहळा ऑनलाईन होणार आहे. मंगळवारी (दि. ६) ...

कोल्हापूर : कोनारोच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शिवाजी विद्यापीठाचा यंदाचा ५७ वा दीक्षांत सोहळा ऑनलाईन होणार आहे. मंगळवारी (दि. ६) सकाळी ११ वाजता शाहू सिनेट सभागृहातून शिववार्ता यु ट्यूब चॅनेलवरुन थेट प्रसारण होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारती तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे मार्गदर्शन करणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंंत्री उदय सामंत हे देखील ऑनलाईनच सहभाग घेणार आहेत.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी.शिर्के यांनी शनिवारी ऑनलाईन पत्रकार बैठकीत ही माहीती दिली. यावेळी पदार्थ विज्ञान विभागातील दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी सौरभ पाटील याची राष्ट्रपती सुवर्णपदकासाठी, तर सातारा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाची विद्यार्थिनी महेश्वरी गोळे हिची कुलपती पदकासाठी निवड घोषित करण्यात आली.

यावेळी प्र- कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील उपस्थित होते.

बॉक्स ०१

७७ हजार ५४२ जण घेणार पदवी प्रमाणपत्र

बाॅक्स ०२

प्रत्यक्ष उपस्थित राहू पदवी घेणारे : १९८४

महाविद्यालयातून पदवी घेणारे : ४५ हजार ३०७

पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र घेणारे : ३० हजार २५१

बॉक्स ०३

शाखानिहाय पदवीधर

विज्ञान व तंत्रज्ञान शाखा : ३५ हजार ५९७

वाणिज्य व व्यवस्थापन शाखा : २१ हजार ९२७

मानव्यविद्या शाखा : १७ हजार ८८३

बॉक्स ०४

राष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेला सौरभ संजय पाटील हा कौलगे (ता. कागल) येथील आहे. तो शिवाजी विद्यापीठात एमएस्सीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. मागील वर्षातील क्रीडा, बौध्दिक, कला क्षेत्रासह एनसीसी, एनएसएस तसेच व्यक्तिमत्त्व, शारीरिक आरोग्य, भाषा शुध्दता, सर्वसाधारण वर्तवणूक व नेतृत्वगुण याच्या जोरावर राज्यपालांकडून दिल्या जाणाऱ्या या पदकासाठी निवड झाली आहे. (फोटो: ०३०४२०२१-कोल-सौरभ पाटील विद्यापीठ)