शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी बँक अपहार प्रकरणी २९ जणांवर गुन्हा

By admin | Updated: August 25, 2015 00:19 IST

संचालक, कर्मचारी जबाबदार : १३ कोटी ३१ लाखाचा भ्रष्टाचार,बँक अवसायानात

गडहिंग्लज : अवसायानात असलेल्या येथील श्री शिवाजी सहकारी बँकेचे १ एप्रिल १९९८ ते ३१ मार्च २०१० अखेर फेरलेखापरीक्षण करून १३ कोटी ३१ लाख ३२ हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी २९ जणांविरोधात लेखापरीक्षकांनी गडहिंग्लज पोलिसांत फिर्याद दिली. जनरल मॅनेजर, विविध शाखांचे शाखाधिकारी, वसुली अधिकारी, आदींसह संचालकांचा यामध्ये समावेश आहे. पोलिसांतील माहितीनुसार अवसायानात गेल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडील आदेशानुसार डी. ए. चौगुले यांनी बँकेचे फेरलेखापरीक्षण केले. त्यामध्ये संचालकांसह विविध पदांवर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर करीत अपहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आयडीबीआय बँकेतून शिवाजी बँकेच्या खात्यावरील रक्कम रोखीने काढणे, त्याची किर्दीला नोंद न घेणे, कोट्यवधीची रक्कम कोणत्याही पावतीशिवाय कीर्दवहीला खर्च टाकणे, यंत्रमाग नसताना सबसिडी मिळविणे, कर्जाचे दस्ताऐवज नसताना रक्कम खर्च टाकणे, कर्ज खात्यावर येणे बाकी असताना ना देय प्रमाणपत्र देणे, आदींसह विविध प्रकाराने अपहार झाल्याचे लेखापरीक्षकांच्या निदर्शनास आले. १४ आॅगस्ट रोजी लेखापरीक्षकांनी आपला फेरलेखापरीक्षण अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केला असून, त्यांनी आज २९ जणांविरोधात तब्बल ४४ पानांची फिर्याद गडहिंग्लज पोलिसांत दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका शेळके याबाबत अधिक तपास करीत आहेत. यांच्याविरोधात गुन्हा दाखल सुधीर रामचंद्र देसाई (जनरल मॅनेजर), आबासाहेब विठोबा देसाई (गडहिंग्लज शाखाधिकारी), सुधाकर शामराव देसाई (अकाऊंट/ शाखाधिकारी गडहिंग्लज), कृष्णा बाळाप्पा कांबळे (कोल्हापूर शाखाधिकारी), तुकाराम गणपती पाटील (क्लार्क-शाखा कोल्हापूर), सुनील श्रीकांत मोकाशी (क्लार्क / कॅशिअर शाखा कोल्हापूर), संजय रामचंद्र कर्णेकर (कॅशिअर-शाखा गडहिंग्लज), गजानन शिवराम कळेकर (शाखाधिकारी शाखा हरळी), अरुण शामराव देसाई (वसुली अधिकारी), विजय आनंदा शिंदे (कॅशिअर-शाखा गडहिंग्लज), आप्पासाहेब शिवाजी नार्वेकर (क्लार्क - मुख्यालय-गडहिंग्लज), संचालक प्रमोद जयसिंगराव रणनवरे, बाबासाहेब सखगोंडा पाटील, दिलीप श्रीपतराव माने, तानाजी ईश्वर मोहिते, प्रकाश भीमराव चव्हाण, किसनराव विठ्ठल कुराडे, दत्ताजीराव रामराव नलवडे, बाजीराव गणपतराव देसाई, किरण धोंडिराम कदम, बाळासाहेब कृष्णराव चव्हाण, भरत बापूगोंडा पाटील, संजय तानाजीराव मोकाशी, चंद्रकांत मायाप्पा कांबळे, गुरुनाथ भीमराव पाथरवट, गोविंदराव सटवोजी देसाई व संचालिका प्रेमला खोत व विजयमाला विजयसिंह रणनवरे.