शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:44 IST

कुरुंदवाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कर्तृत्वाने जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे विचार तळागाळापर्यंत रुजविण्यासाठी ...

कुरुंदवाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कर्तृत्वाने जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे विचार तळागाळापर्यंत रुजविण्यासाठी शिवसैनिकांनी आपापसातील मतभेद विसरून तालुक्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावा. शहर व ग्रामीण विकासासाठी लागेल तितका निधी देण्यास कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

येथील भालचंद्र थिएटर सभागृहात शिरोळ तालुका शिवसेनेच्या चैतन्य मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंत्री सामंत बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव होते. खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यात तीन पक्षाचे सरकार असल्याने कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. कुरुंदवाडमधील संस्थानकालीन कुस्ती मैदानाच्या विकासासाठी दोन कोटी तसेच भालचंद्र थिएटरला पूर्ववैभव मिळवून देण्याबाबत सहा महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले.

खासदार माने म्हणाले, शिरोळ तालुक्याला प्रत्येक वर्षी महापुराचा फटका सोसावा लागतो. त्यामुळे राज्य शासनाकडून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. माजी आमदार उल्हास पाटील, मुरलीधर जाधव, वैभव उगळे, मधुकर पाटील आदींची भाषणे झाली.

यावेळी तालुक्यातील शिवसेनेच्या नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा आणि शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार झाला.

मेळाव्यास जि. प.चे समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, मंगल चव्हाण, शिवाजी पाटील, माधुरी ताकारे, रेखा जाधव, बाबासाहेब सावगावे, राजू आवळे, प्रतीक धनवडे, पराग पाटील, आरसगोंडा पाटील उपस्थित होते. स्वागत वैभव उगळे यांंनी केले. सूत्रसंचालन आण्णासो बिल्लोरे यांनी केले.

----------------------

चौकट - मुरलीधर जाधव यांची टीका

जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहोत. मात्र, शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद घेऊनही अनेक ठिकाणी ग्रामपंचायत, पंचायत समितीत पदे मिळविताना मंत्र्यांकडून शिवसेनेच्या उमेदवाराला डावलले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत ही माहिती जावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केली.

फोटो - २००२२०२१-जेएवाय-०४

फोटो ओळ - कुरुंदवाड येथे शिवसेनेच्या चैतन्य मेळाव्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, वैभव उगळे उपस्थित होते.