शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पोल्ट्रीधारकांच्या व्याजमाफीसाठी शिवसेना आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:24 IST

(लोकमत कात्रण - १९०५२०२१-कोल-पोल्ट्री) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना, लॉकडाऊन, बर्ल्ड फ्लू यामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या पोल्ट्रीधारकांच्या कर्जाला व्याजमाफी ...

(लोकमत कात्रण - १९०५२०२१-कोल-पोल्ट्री)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना, लॉकडाऊन, बर्ल्ड फ्लू यामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या पोल्ट्रीधारकांच्या कर्जाला व्याजमाफी द्यावी, यासाठी आता शिवसेनाही आग्रही राहिली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांना बुधवारी निवेदन दिले.

एक मागून एक संकटे पोल्ट्रीधारकांच्या मागे लागली आहेत. गेली दोन वर्षे हा व्यवसाय पूर्णपणे अडचणीत आला आहे. बँकांकडून लाखो रुपयांची कर्जे घेऊन पक्ष्यांचे संगोपन सुरू आहे. त्यात दुसऱ्या लाटेमुळे सगळे ठप्प आहे. मालाचा उठाव होईना, दरात मोठी घसरण झाल्याने बँकांचे हप्ते भरायचे कसे? असा पेच पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांसमोर आहे. यासाठी जिल्हा बँकेने त्यांच्याकडील कर्जदार पोल्ट्रीधारकांचे व्याज माफ करावे, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माने यांची भेट घेऊन ही मागणी लावून धरली. बँकेकडील कर्जदारांचे १ जून पूर्वीचे व्याज माफ करावे. त्याचबरोबर राज्यातील पोल्ट्रीधारकांनाही दिलासा देण्याची गरज असून, त्यांचेही राज्य सरकारने व्याजमाफीचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी विजय देवणे यांनी केली.

दरम्यान, पोल्ट्रीधारकांच्या व्याजमाफीबाबत जिल्हा बँकेच्या पातळीवर चाचपणी सुरू आहे. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय बँक जाहीर करण्याची शक्यता आहे.

फोटो ओळी : जिल्हा बँकेकडील पोल्ट्रीधारकांचे कर्जावरील व्याज माफ करावे, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी बुधवारी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्याकडे दिले. (फोटो- १९०५२०२१-कोल- केडीसीसी)