शिरोळ : संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:13 IST2021-02-20T05:13:23+5:302021-02-20T05:13:23+5:30

सिद्धेश्वर देवाची यात्रा रद्द दत्तवाड : घोसरवाड (ता. शिरोळ) येथील सिद्धेश्वर देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. ...

Shirol: Brief News | शिरोळ : संक्षिप्त बातम्या

शिरोळ : संक्षिप्त बातम्या

सिद्धेश्वर देवाची यात्रा रद्द

दत्तवाड : घोसरवाड (ता. शिरोळ) येथील सिद्धेश्वर देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. कोणतेही कार्यक्रम न घेण्याचा निर्णय यात्रा समितीने घेतला आहे. देवस्थानचे परंपरागत विधी व पालखी मानकऱ्यांच्या देखरेखीखाली होईल. सर्व ग्रामस्थांनी याला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत व यात्रा समितीने केले आहे.

------------------

‘दत्त’च्या खेळाडूंचे यश

शिरोळ : सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय मार्शल आर्ट स्पर्धेत शिरोळ दत्त साखर कारखान्याचे खेळाडू आरिफ झाकीरहुसेन देसाई व आरमान झाकीरहुसेन देसाई या दोघा भावांनी ब्रॉन्झ पदक पटकाविले. खेळाडूंना दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष उद्यानपंडित गणपतराव पाटील, क्रीडाशिक्षक देबाजे यांच्यासह पालकांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो - १९०२२०२१-जेएवाय-०१-आरिफ देसाई व आरमान देसाई

--------------------

रस्त्याचे काम सुरू

जयसिंगपूर : भैरववाडी येथील नांदणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. शुक्रवारी या रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Shirol: Brief News