भुदरगड तालुक्यातील प्रचार शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST2021-01-14T04:20:48+5:302021-01-14T04:20:48+5:30

तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लागली आहे. त्यापैकी पाचर्डे, वासणोली, पाटगाव, मुरुक्टे या चार ग्रा.पं. बिनविरोध झाल्याने उर्वरित ४१ ग्रामपंचायतींमध्ये ...

Shigala campaign in Bhudargad taluka | भुदरगड तालुक्यातील प्रचार शिगेला

भुदरगड तालुक्यातील प्रचार शिगेला

तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लागली आहे. त्यापैकी पाचर्डे, वासणोली, पाटगाव, मुरुक्टे या चार ग्रा.पं. बिनविरोध झाल्याने उर्वरित ४१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. उघड प्रचाराचा बुधवारी शेवटचा दिवस असल्याने सकाळपासून पदयात्रा, रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर येथे शिवसेनेचे बी. डी. भोपळे यांच्या रांगणा माउली आघाडीच्या विरोधात भाजपचे सरचिटणीस प्रवीणसिंह सावंत हे तळेमाउली आघाडीच्या माध्यमातून भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस यांना सोबत घेऊन निकराचा लढा देत आहेत. खानापूरबरोबरच गंगापूर, म्हसवे, नाधवडे, बसरेवाडी गावातील निवडणूक लक्षवेधी होणार आहे.

फोटो ओळ

लक्षवेधी खानापूर गावातील उमेदवार रॅली काढताना दोन विरोधी गटाच्या पदयात्रा समोरासमोर जाताना.

Web Title: Shigala campaign in Bhudargad taluka