शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पेईंग गेस्ट म्हणून आली अन् डल्ला मारून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 2:17 PM

पेईंग गेस्ट म्हणून घरी राहण्यास आलेल्या तरुणीने सोन्याच्या दागिने व विविध बँक खात्यांतील रकमेसह ९४ हजारांची चोरी केल्याप्रकरणी संशयित स्नेहा दिलीप सातपुते (रा. सुभाषनगर) हिच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी रोहिणी रमेश होनमोरे (वय ३१, रा. विशालतीर्थ पार्क, चौगुले मळा, शिंगणापूर, ता. करवीर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

ठळक मुद्देपेईंग गेस्ट म्हणून आली अन् डल्ला मारून गेलीसोने, रोकड अशी ९४ हजारांची लूट

कोल्हापूर : पेईंग गेस्ट म्हणून घरी राहण्यास आलेल्या तरुणीने सोन्याच्या दागिने व विविध बँक खात्यांतील रकमेसह ९४ हजारांची चोरी केल्याप्रकरणी संशयित स्नेहा दिलीप सातपुते (रा. सुभाषनगर) हिच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी रोहिणी रमेश होनमोरे (वय ३१, रा. विशालतीर्थ पार्क, चौगुले मळा, शिंगणापूर, ता. करवीर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर तरुणी १३ मे २०२० ते १९ जून २०२० पर्यंत फिर्यादीच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. या दरम्यान तिने मोबाईलद्वारे विविध बँक खात्यांतून वेळोवेळी १५ हजार रुपये काढून घेतले; तर कपाटात ठेवलेल्या २२ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या अंदाजे किंमत ६६ हजार असा ९४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

यासोबत तिने फिर्यादीचे आधार कार्ड, पॅन कार्ड, घराची कागदपत्रे, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, सहीची सॉफ्ट कॉपी असे गुगल ॲपद्वारे चोरून नेल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली असून साहाय्यक फौजदार भगवान गिरीगोसावी तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर