शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

शरद इंजिनिअरिंगची हॅट् ट्रिक (हॅट् ट्रिक शब्द जोडून घ्यावा. होत नाही)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST

यड्राव : येथील शरद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय डिपेक्स २०२१ अंतर्गत ...

यड्राव : येथील शरद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय डिपेक्स २०२१ अंतर्गत झालेल्या प्रोजेक्ट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शिवाजी विद्यापीठ, डिपेक्स व सृजन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेमध्ये इन्स्टिट्यूटने सलग तिस-या वर्षी प्रथम क्रमांक मिळवत हॅटट्रिक साधली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा आॅनलाइन झाली. स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभासाठी देवदत्त जोशी, मीनल पटेल, डॉ. सरिता बाळशेतवार, प्रा. निर्भय विस्पुते, धनंजय भटाले उपस्थित होते.

स्पर्धेसाठी महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकमधून १५० पेक्षा अधिक प्रोजेक्ट व ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. संयोजकांनी विविध विभागातील आठ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विजेत्यांची निवड केली.

शरद इन्स्टिट्यूटमधील संकेत बापट, रोहित दायमा, अभिषेक भगाटे व श्रद्धा महाडिक या विद्यार्थ्यांनी तयार केलेला 'डिझाइन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट आॅफ आय.ओ.टी. बेस्ड व्हॅक्सिन स्टोअरेज अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम' हा प्रकल्प वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनच्या निर्देशनानुसार लस २ ते ८ अंश सेल्सियस तापमानात ठेवावी लागते. चुकीच्या साठवणूक पद्धतीमुळे जगभरामध्ये २५ टक्के तर भारतात ४० टक्के लसींचे नुकसान होते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राला मोठे नुकसान सोसावे लागते.

या सिस्टीममध्ये थर्मल एनर्जी स्टोअरेजचा वापर करून इनआॅरगॅनिक आणि युटेक्टिक हे फेजचेंज मटेरिअल वापरले आहे. ज्यामुळे वीज नसतानाही पुढील सहा तास तापमान नियंत्रणात ठेवता येते. प्रा. अवेसअहमद हुसेनी यांच्या मार्गदर्शनाखालील या संशोधन प्रकल्पाला प्राचार्य डॉ. एस. ए. खोत, डॉ. पी. एम. भागवत यांचे सहकार्य मिळाले. संस्थेचे अध्यक्ष आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.