शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळच्या वैकुंठधाम स्मशानभूमीचे रूप पालटणार

By admin | Updated: December 19, 2014 23:35 IST

ग्रामपंचायतीचा पुढाकार : ४८ लाख रुपये खर्चाची तरतूद; सहा ठिकाणी शवदाहिनी बांधणार

संदीप बावचे - शिरोळ येथे ग्रामपंचायत निधी, उर्वरित वैज्ञानिक विकास महामंडळ व अन्य निधींतून सुमारे ४८ लाख रुपये खर्चाच्या या कामातून एक सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यात येत आहे. वैकुंठधाम स्मशानभूमीत सहा ठिकाणी शवदाहिनी बांधण्यात येणार असून, त्याठिकाणी शेड उभारून तीन हजार लोक बसतील अशी बैठक व्यवस्था, शिवाय बगीचा, वृक्ष लागवड, कंपौंड, आदींचा यात समावेश असून, शिरोळ ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन एक चांगले पाऊल उचलले आहे. येथे पंचगंगा नदीवर जुन्या कुरुंदवाड रस्त्याकडे शिरोळची स्मशानभूमी आहे. अपुऱ्या स्मशानभूमी शेडमुळे अंत्यविधी किंवा अन्य विधीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे. दरवर्षी नदीला पूर आल्यानंतर शेडची दुरवस्था होते. प्रत्येकवेळी खर्च करून या स्मशानशेडची डागडुजी करण्यात येते. गावची लोकसंख्या ४० ते ४५ हजारांच्या घरात पोहोचली आहे. शिवाय छोट्याशा स्मशानशेडमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात थांबण्याची व्यवस्थाही नसल्यामुळे मोठी गैरसोय होते. शिरोळ ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत निधीबरोबरच उर्वरित वैज्ञानिक विकास महामंडळाच्या निधीशिवाय विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या फंडातील निधी व अन्य निधींतून सुमारे ४८ लाख रुपये खर्चातून एक सुसज्ज स्मशानभूमी तयार केली जात आहे. एकाचवेळी सहा ठिकाणी दहन विधी करता येईल यासाठी शवदाहिनी बांधल्या जाणार आहेत. एकाच वेळी तीन हजार लोकांची बैठक व्यवस्था करण्यासाठी सुसज्ज शेडही उभारले जाणार आहे. पावसाळ्यात पूर आल्यानंतर विद्युत उपकरणे खराब होऊ नयेत यासाठी वॉटरफ्रूप बल्बदेखील बसविले जाणार आहेत. स्मशानभूमी परिसरात दोन्ही बाजूला झाडे लावण्यात येणार असून, गार्डन व्यवस्था, कंपौंडदेखील बांधण्यात येणार आहे. सध्या सुसज्ज अशी स्मशानभूमी बांधण्याचे काम सुरू असून, निश्चित ग्रामपंचायतीने एक चांगले पाऊल उचलले आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने यापूर्वी गणेश विसर्जनावेळी निर्माल्यकुंड उभारून उपक्रम राबविला होता. याचप्रकारे रक्षाविसर्जनासाठी रक्षाकुंड उभारण्यात येणार आहे. ‘पाच मूठ रक्षा नदीत’ यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे. यामुळे पाण्याचे प्रदूषण रोखले जाणार आहे.- पृथ्वीराज यादव, उपसरपंच शिरोळनिधी असूनही जिल्ह्यातील अनेक गावांतील स्मशानशेड बांधकामाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. निधी आहे जागा नाही, तसेच लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे स्मशानशेडचे बांधकाम होत नसल्याची स्थिती असताना शिरोळ ग्रामपंचायतीने मात्र चांगला पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या या पुढाकारात लोकसहभागातून पाठबळ मिळाले, तर परिसराचा विकास होणार आहे. शिरोळ येथील पंचगंगा नदीकाठी सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे.