शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शक कारभारामुळेच ‘शाहू’ची प्रगती

By admin | Updated: August 5, 2014 00:16 IST

समरजितसिंह घाटगे : यमगे येथे घाटगे गटाचा मेळावा उत्साहात

मुरगूड : दुग्ध व्यवसाय अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडला असल्याने जिल्ह्यासह राज्यातील अनेक दूध संघ बंद पडले; पण विक्रमसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनानुसार, पारदर्शकपणे व सभासद हिताचा कारभार केल्यानेच शाहू दूध संघाने प्रगती केली आहे, असे प्रतिपादन समरजितसिंह घाटगे यांनी केले.यमगे (ता. कागल) येथे शाहू सहकारी दूध संस्थेच्या वतीने सभासदांना भांडी वाटप, सवलत कूपन वाटप, विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम व कार्यकर्त्यांचा मेळावा, अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच भारती किल्लेदार-पाटील होत्या.यावेळी बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुनीलराज सूर्यवंशी यांनी संघाविषयी माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते सभासदांना भांडी व कूपन वाटण्यात आले. बिरदेव डोणे, शैलेंद्र कोंडेकर, अवधूत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. नारायण पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष दत्तामामा खराडे, संचालक वसंतराव पाटील, शाहू दूध संघाचे संचालक संजय पाटील, संचालक अमरसिंह घोरपडे, रामभाऊ खराडे, अनंतराव फर्नांडिस, हिंदुराव किल्लेदार, मारुती पाटील, संस्था अध्यक्ष प्रकाश देसाई, उपाध्यक्ष पांडुरंग कोंडेकर, सचिव रवींद्र पाटील उपस्थित होते. विजय गुरव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)