शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

अनं शेवंता आजीच्या घरात सात दशकानंतर आली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 18:25 IST

mahavitaran Kolhapur : राधानगरी तालुक्याच्या ग्रामीण भागात आजही शिक्षण,आरोग्य, पाणी, विज यासारख्या सेवा सुविधा म्हणाव्या तितक्या पद्धतीने पोहोचलेल्या नाहीत. या परिसरातील काही खेडेगावांमध्ये साधी विजही पोहोचलेली नाही. धामोड येथील शेवंता देसाई नावाच्या एका वयोवृद्ध महिलेच्या घरामध्येही स्वातंत्र्यप्राप्तीच्या सात दशकानंतर वीज आली.

ठळक मुद्देसत्तर वर्षे दिव्याच्या प्रकाशातच संसारविद्यूत क्षेत्र तांत्रिक युनियच्या कर्मचाऱ्यांचा पुढाकार

श्रीकांत ऱ्हायकरधामोड  : राधानगरी तालुक्याच्या ग्रामीण भागात आजही शिक्षण,आरोग्य, पाणी, विज यासारख्या सेवा सुविधा म्हणाव्या तितक्या पद्धतीने पोहोचलेल्या नाहीत. या परिसरातील काही खेडेगावांमध्ये साधी विजही पोहोचलेली नाही. धामोड येथील शेवंता देसाई नावाच्या एका वयोवृद्ध महिलेच्या घरामध्येही स्वातंत्र्यप्राप्तीच्या सात दशकानंतर वीज आली.

धामोड येथील शेवंता देसाई नावाच्या एका वयोवृद्ध महिलेच्या घरामध्ये अद्यापही विज नव्हती. रॉकेलच्या दिव्याचा उजेड हाच काय तो तिच्या सोबती. विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियनच्या कर्मचाऱ्यांच्या नजरेस हा प्रसंग दिसला. क्षणाचाही विलंब न लावता एका सामाजिक भावनेतून या कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून या महिलेच्या घरात आज वीज कनेक्शन जोडले. त्यामुळे शेवंता आजींच्या घरातील दिव्याचा उजेड आज विजेच्या प्रकाशाने भेदून टाकला.धामोड ( ता. राधानगरी ) येथील शेवंता तुकाराम देसाई या आजीबाई एकट्याच राहतात. घरी अठराविश्व दारिद्र्य . राहायला नीटसे घर नाही, अत्यंत गरिब कुटुंब, पोटभर जेवणासाठी दुसऱ्याच्या घरची धुनीभांडी करून पोटचा उदरनिर्वाह चालवायचा, मग वीज कनेक्शन तरी कुठले किंवा पाणी कनेक्शनचे नाव दुरच . माहिनाभराकाठी मिळणारे जेमतेम एक लिटर रॉकेल पुरवून पुरवून वापरत संध्याकाळी लवकरच जेवण आटोपून दिवा बंद करून झोपी जाणे हा त्यांचा नित्यक्रम. शेवंता आजींच्या वाट्याला आलेले हे 'जीवन ' त्या कसलीही काकू न करता जगत होत्या . याबद्दल कुठलीही तक्रार त्यांनी केली नाही. धामोड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सबस्टेशनचे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सर्कल संघटक विलास डवर व त्यांचे सहकारी निलेश पोतदार, दत्तात्रय जाधव, अमर फराकटे, युवराज चौगुले, उमेश कांबळे,शेखर जाधव, कपिल चौगुले, यांना लाईट बील वसुली दरम्यान या आजींच्या घरी लाईट नाही ही बाब लक्षात आली.

त्यांनी तात्काळ शाखा अभियंता टंकसाळे यांना ही घटना सांगितली व कनेक्शनसाठी लागणारा खर्च सर्व कर्मचाऱ्यांनी गोळा करत एका सामाजिक भावनेतून अवघ्या दोनच दिवसात या आजीबाईंच्या घरी लाईट जोडून देण्याचे काम केले. गेल्या कित्येक वर्षापासून ज्या घरात फक्त दिव्याचा उजेड चमकत होता . त्याची जागा आज लख्ख प्रकशाच्या बल्बने घेतली. त्यामुळे शेवंता आजींच्या चेहऱ्यावर आज वेगळाच आनंद पहायला मिळाला . 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर