शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाऊनने लसीकरणाच्या नोंदणीला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST

कोल्हापूर : कोरोनाची लस घ्यावयाची असल्यास त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. मात्र, सर्व्हर डाऊन, ओटीपीसाठी ...

कोल्हापूर : कोरोनाची लस घ्यावयाची असल्यास त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. मात्र, सर्व्हर डाऊन, ओटीपीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब होत आहे. अठरा वर्षांतील व्यक्तींच्या नोंदणीबाबतची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.

सरकारच्या सूचनेनुसार (www.cowin.gov.in) या संकेतस्थळावर कोरोना लस घेण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. पण, या संकेतस्थळावर नोंदणी करताना सर्व्हर डाऊन आणि नेटवर्कची समस्या भेडसावत आहे. मोबाइल क्रमांक नोंदविल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा ओटीपी मिळण्यास उशीर होत आहे. साधारणपणे एका व्यक्तीची नोंदणी करण्यास दहा मिनिटे लागतात. तांत्रिक अडचण उद्‌भवल्यास ही प्रक्रिया पूर्ण करण्यास २० ते २५ मिनिटे लागत आहेत. सरकारने अठरा वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची नोंदणीची प्रक्रिया दि. २८ एप्रिलपासून सुरू होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही ती सुरू झालेली नाही. शहरातील काही परिसर आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केेंद्राची नावे या संकेतस्थळावर येत नाहीत. एकसारखी नावे असणाऱ्या शहरांची नोंद करताना काही गोंधळ निर्माण होत आहे. लसीकरणातील नोंदणीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी या तांत्रिक अडचणी दूर करणे आवश्यक ठरणार आहे.

तरुणाईचा पुढाकार

ज्या व्यक्तींकडे स्मार्टफोन नाहीत. जे तांत्रिक साक्षर नाहीत. त्यांची लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करून देण्यासाठी तरुणाईने पुढाकार घेतला आहे. केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे एनएसएसचे शंभर स्वयंसेवक योगदान देत आहे. जनसंघर्ष सेनेच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केले. मदत फाउंडेशनसह विविध संघटना, व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी, याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. अनेकांनी या माहितीचे स्टेटस ठेवले आहेत.

नोंदणीसाठी स्वतंत्र केंद्र करावे

४५ वर्षांवरील अनेक नागरिकांकडे स्मार्टफोन नाहीत. ऑनलाइन नोंदणी करणे त्यांना शक्य होत नाही. त्यावर पर्याय म्हणून या नोंदणीसाठी शहरातील प्रत्येक प्रभागात आणि गावांमध्ये स्वतंत्र केंद्र सुरू करावे. त्यामध्ये परिसरातील तरुण मंडळे, सामाजिक, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे, अशी मागणी फ्रंटलाइन वॉरिअर्स सुभाष माने यांनी गुरुवारी केली.