शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

शाहुवाडीतील पोरी, मुंबई पोलिस भरतीत ठरल्या भारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 16:47 IST

अनिल पाटील  सरुड : शाहूवाडी तालुका हा दुर्गम व डोंगराळ म्हणून ओळखला जात असला तरी येथील मुलांसह मुलीनीही आपल्या ...

अनिल पाटील सरुड : शाहूवाडी तालुका हा दुर्गम व डोंगराळ म्हणून ओळखला जात असला तरी येथील मुलांसह मुलीनीही आपल्या जिद्दीच्या जोरावर विविध क्षेत्रात अनेक यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. स्पर्धा परिक्षा असो, सैन्य भरती असो अथवा पोलिस भरती असो या तिन्ही क्षेत्रात या तालुक्यातील मुलांसह, मुलींनीही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत शाहूवाडी तालुक्याच्या शिरपेचात नेहमीच मानाचा तुरा खोवला  आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई पोलिस भरतीमध्ये तालुक्यातील तब्बल १२ मुलींनी यश संपादन करत खाकी वर्दीचे आपले स्वप्न साकार केले आहे.शाहूवाडी तालुक्यातील प्राजक्ता संजय पाटील (सावे), कोमल नथुराम लाळे (कडवे पैकी लाळेवाडी), स्वाती शामराव पाटील (आरुळ), प्रतिक्षा देवानंद न्यारे, प्राजक्ता देवानंद न्यारे (दोघी शिरगाव), पुजा संपत कदम (अमेणी), दिपाली आनंदा पिपंळे, सोनाली हणमा पिंपळे (दोघी परखंदळे पैकी पिंपळेवाडी), प्रतिक्षा भगवान बजागे, रविना ज्ञानदेव बजागे (दोघी बजागेवाडी), उषा एकनाथ डफडे (पेगूचा धनगरवाडा), अवंतिका ज्ञानदेव चौगुले (गोगवे) या १२ रणरागिणीनी मुंबई पोलिस भरतीत बाजी मारली.सर्व मुली सर्वसामान्य कुटुंबातीलया सर्व मुली डोंगर कपारीतील गावामधील व सर्वसामान्य शेतकरी कुंटुंबातील आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द व परिश्रमाच्या जोरावर या सर्व मुलींनी मिळवलेले यश हे खरोखरच ग्रामीण भागातील इतर मुलींसाठी तसेच मुलांसाठीही प्रेरणादायी आहे.सख्या बहिणींच यश शिरगाव येथील प्रतिक्षा देवानंद न्यारे व प्राजक्ता देवानंद न्यारे या दोन सख्या बहिणींनी एकाच वेळी  मुबई पोलिस भरतीमध्ये यश संपादन केले आहे. 

खाकी वर्दींचे पहिल्या पासुन आकर्षण होत. आई वडिलांचे शेतीतील कष्ट लहानपणा पासुन अगदी जवळून पाहिले आहे. त्यांच्या कष्टाला,  मेहनतीला समाधानाची फुंकर मिळावी यासाठी शिक्षण घेत पोलिस भरतीसाठी जिद्दीने सराव केला व यश मिळवले. - प्राजक्ता पाटील, सावे 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस