शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांदा सुधारित : भगवे ध्वज, भगवे फेटे, गुढीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:18 IST

कोल्हापूर : गेले दोन दिवस जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये एक निराळीच लगबग सुरू ...

कोल्हापूर : गेले दोन दिवस जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये एक निराळीच लगबग सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतलेल्या दिवशी म्हणजे रविवार, दि. ६ जून रोजी शिवस्वराज्य दिनानिमित्त गुढी उभारली जाणार असल्यामुळे या नियोजनाची धांदल पाहावयास मिळत आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून राज्याभिषेकदिनी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये गुढी उभारण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता सर्वत्र एकाच वेळी होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदांमध्ये त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूरमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते गुढी उभारण्यात येईल.

यानिमित्ताने उभारण्यात येणारा भगवा ध्वज, गुढीची उंची, त्यावरील कलश या सगळ्यांची तयारी सुरू आहे. यासाठी ग्रामविकास विभागाने राजदंड म्हणजे गुढी कशी उभारावी, भगव्या ध्वजावर कोणती चिन्हे असावीत, याचे मार्गदर्शन केले असून, त्यानुसार तयारीसाठी सामान्य प्रशासनासह, बांधकाम विभागाची गडबड सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे जातीने या कार्यक्रमाच्या नियोजनवर लक्ष ठेवून आहेत.

०४०६२०२१ कोल झेडपी ०१

शिवस्वराज्य दिनानिमित्त उभारण्यात येणाऱ्या गुढीचे संकल्पचित्र.