शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘खादी ग्रामोद्योग’ लाभार्थींच्या शोधात

By admin | Updated: October 9, 2015 00:45 IST

विशेष घटक योजना : मातंग, दलित, बुरूड, चर्मकार, सुतार यांना लाभ

कृष्णा सावंत --पेरणोली--आजरा तालुक्यातील सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या खादी ग्रामोद्योग संस्थेला विशेष घटक योजनेसाठी लाभार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने एक महिन्यापासून संस्था लाभार्थ्यांच्या शोधात आहे.सहकार तत्त्वावर चालणारी, पण शासनाचे नियंत्रण असणाऱ्या खादी ग्रामोद्योग संस्थेकडे प्रक्रिया करणाऱ्या लघुउद्योगासाठी विविध योजना आहेत. त्यापैकी दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांसाठी विशेष घटक योजनेच्या माध्यमातून लाभार्थी निवड केली जाते. त्यापैकी मातंग, दलित, बुरुड, चर्मकार, सुतार अशा दुर्लक्षित घटकातील दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो.एप्रिल ते मार्च या कालावधीत ५० टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते. २० हजार रुपये कर्जमर्यादा आहे. त्यापैकी १० हजार रुपये अनुदान बँक खात्यावर जमा केले जातात. यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत संबंधित लाभार्थ्यांचे खाते असणे आवश्यक आहे. पाच वर्षे परतफेड करण्याची मुदत आहे.समाजातील मागासलेला वंचित घटक आर्थिकदृष्ट्या लघुउद्योगाच्या माध्यमातून सक्षम व्हावा व त्याच्या रोजगाराला चालना मिळावी हा प्रमुख उद्देश आहे. तालुक्यातील दुर्लक्षित घटकातील दारिद्र्यरेषेखालील बहुतांशी लाभार्थ्यांनी यापूर्वी योजनांचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचे प्रमाण कमी आहे. किमान २० प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. प्रस्ताव न आल्यास अनुदान परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र व गरजू लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याची गरज आहे. वेतबांबू, झाडू, दोरी व्यवसाय, टेलरिंग, गवंडी, सुतार, इलेक्ट्रिक, मिरची कांडप, आदी व्यवसायासाठी लाभ दिला जातो.दारिद्र्यरेषेखालील गरजू व पात्र लाभार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. प्रस्तावाच्या अनुक्रमणिकेनुसार मंजुरीसाठी प्राधान्य देण्यात येईल.- के. एस. जाधव, सचिव, खादी ग्रामोद्योग, आजरा.