स्कूटरचालकास रस्त्यात आडवून मारहाण; ७० हजारांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:20 IST2021-05-30T04:20:21+5:302021-05-30T04:20:21+5:30

कोल्हापूर : पैलवानाला उलटे का बोलतोस? या कारणास्तव तीन अनोळखी तरुणांनी एकाची स्कूटर आडवून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ...

Scooter driver beaten on the road; Loot of Rs 70,000 | स्कूटरचालकास रस्त्यात आडवून मारहाण; ७० हजारांची लूट

स्कूटरचालकास रस्त्यात आडवून मारहाण; ७० हजारांची लूट

कोल्हापूर : पैलवानाला उलटे का बोलतोस? या कारणास्तव तीन अनोळखी तरुणांनी एकाची स्कूटर आडवून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील ७० हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली. पाचगाव रोडवर शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या मारहाणीत सुधीर राचप्पा यनोळगे (वय ५९ रा. गिरगाव रोड, पाचगाव ओमकारनगरनजीक, कोल्हापूर) हे जखमी झाले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी: हल्लेखोर व यनोळगे या दोघांत किरकोळ कारणांवरून वाद होता. शनिवारी पहाटे यनोळगे हे आपल्या स्कूटरवरून पाचगाव रोडवरून घरी जात होते. तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांची स्कूटर पाचगाव रोडवर आडवली. त्यानी, पैलवानला उलटे का बोलतोयस का? असा जाब विचारून लाथाबुक्क्यांनी तोंडावर बेदम मारहाण केली. तसेच हल्लेखोरांनी जबरदस्तीने त्यांच्या खिशातील ७० हजार रुपये काढून घेतले. शिवीगाळ करुन बघून घेतो अशी धमकी देऊन ते निघून गेले. हल्ल्यात सुधीर यनोळगे हे जखमी झाले. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून करवीर पोलीस ठाण्यात सुरेश पैलवान (रा. पैलवान चौक, दौलतनगर, राजारामपुरी) यांच्यासह दोघा अनोळखी व्यक्तीवर गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: Scooter driver beaten on the road; Loot of Rs 70,000