शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

शालेय शुल्क तपासणी पथक नेमा, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 14:46 IST

Education Kolhapur : शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाची अंमलबजावणी करत येत्या ४८ तासांच्या आत शालेय शुल्क तपासणी पथक नेमण्यात यावे. या पथकाने पुढील चार दिवसात आपली तपासणी पूर्ण करून आपल्याकडे अहवाल सादर करावा.

ठळक मुद्देशालेय शुल्क तपासणी पथक नेमा, अन्यथा आंदोलनआपचा इशारा : माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाची अंमलबजावणी करत येत्या ४८ तासांच्या आत शालेय शुल्क तपासणी पथक नेमण्यात यावे. या पथकाने पुढील चार दिवसात आपली तपासणी पूर्ण करून आपल्याकडे अहवाल सादर करावा.

अन्यथा पालकांसमवेत आम आदमी पार्टीच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी बुधवारी दिली. त्याबाबतचे निवेदन त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दिले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांची ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. त्यामुळे शाळांचे शिकवणी व्यतिरिक्त इतर खर्च कमी झाले आहेत. काही शाळा पालकांकडून अवाजवी शालेय शुल्काची मागणी करत आहे. अशाप्रकारच्या वसुलीला आळा घालण्यासाठी शालेय शुल्क तपासणी टास्कफोर्स नेमावा, अशी मागणी आपने शिक्षण उपसंचालकांकडे केली होती.

याला प्रतिसाद देत त्यांनी शालेय शुल्क तपासणी पथक नेमण्याचे आदेश दि. ८ जुलैला दिले होते. त्याबाबत ह्यआपह्णच्या शिष्टमंडळाने बुधवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी लोहार यांची भेट घेतली. शालेय शुल्क तपासणी पथकाने सादर केलेल्या अहवालात ज्या शाळा नियमबाह्य शालेय शुल्क वसूल करत आहेत. त्यांना ती वसुली थांबण्याचे लिखित आदेश व्हावेत. ज्या शाळांनी असे शुल्क वसूल केले आहे. ते पालकांना परत देण्यात यावे, आदी मागण्या शिष्टमंडळाने केल्या.

यावेळी उत्तम पाटील, अमरजा पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, विजय हेगडे, दिलीप पाटील, राज कोरगावकर, बसवराज हदीमनी, रविराज पाटील आदी उपस्थित होते.स्पष्ट आदेश द्यावेतराज्य शासनाने आरटीई प्रतिपूर्ती रक्कम आठ हजार रुपये प्रति विद्यार्थी निश्चित केल्याने प्रवेश देणाऱ्या शाळा वरील फरक पालकांकडे मागणी करत आहेत, अशी मागणी करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी देसाई यांनी केली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर