शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वेश्या अड्डा छाप्यामध्ये पळून गेलेल्या सावंतला पोलिसांनीच केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:27 IST

हातकणंगले : येथील एका मंदिराच्या बाजूला भाडोत्री घरामध्ये सुरू असलेल्या वेश्या अड्ड्यावर शनिवारी सायंकाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री ...

हातकणंगले : येथील एका मंदिराच्या बाजूला भाडोत्री घरामध्ये सुरू असलेल्या वेश्या अड्ड्यावर शनिवारी सायंकाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या विशेष पथकाने छापा टाकून पीडित महिलेसह एकाला रंगेहाथ पकडले. या छाप्यावेळी पोलिसाच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेला एजंट ज्ञानेश्वर शंकर सावंत (रा. अमोल बेकरीजवळ, कोरोची) हा पोलिसांचा हस्तक असल्याचे उघड झाले असून, त्याला पळून जाण्यासाठी पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूर - सांगली राज्य मार्गावर हातकणंगले पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका मंदिराच्या दक्षिणेकडील अमर माळवे यांच्या मालकीच्या भाडोत्री घरात गेल्या काही दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना खबऱ्यांमार्फत मिळाली. यातील संशयित ओंकार पन्हाळकर व ज्ञानेश्वर सावंत हे मोबाईलवर फोटो पाठवून ग्राहकांना आकर्षित करत होते, तर पीडित माहिलांना वेश्यागमनासाठी प्रवृत्त करत होते.

विशेष पथकाने बोगस गिऱ्हाईक पाठवून प्रथम खात्री केली व त्यानंतर आरोपींना रंगेहाथ पकडले.

फोटो = ज्ञानेश्वर सावंत आणि पोलीस कर्मचारी.