तळसंदे उपसरपंचपदी सावित्री चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST2021-01-14T04:20:14+5:302021-01-14T04:20:14+5:30

नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील उपसरपंचपदी आमदार डॉ. विनय कोरे यांचे समर्थक माजी उपसरपंच मनोहर चव्हाण ...

Savitri Chavan as Talsande Deputy Panch | तळसंदे उपसरपंचपदी सावित्री चव्हाण

तळसंदे उपसरपंचपदी सावित्री चव्हाण

नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील उपसरपंचपदी आमदार डॉ. विनय कोरे यांचे समर्थक माजी उपसरपंच मनोहर चव्हाण यांच्या गटाच्या सावित्री राजाराम चव्हाण यांची निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून लोकनियुक्त सरपंच अमरसिंह पाटील यांनी काम पाहिले.

उपसरपंच संग्रामसिंह शिंदे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी निवडणूक झाली. उपसरपंच पदासाठी सावित्री चव्हाण, विशाल चव्हाण, विजया चव्हाण यांनी अर्ज भरले होते. मतदान होऊन सावित्री चव्हाण विजयी झाल्या.

यावेळी सदस्य सुनीता चव्हाण, महेश कुंभार, प्रकाश कोळी, शिवाजी पाटील, शांताबाई पाटील, नरेश कांबळे, सुधा कांबळे, राजेंद्र शिंदे, अर्चना पाटील, मनीषा संकपाळ, संग्रामसिंह शिंदे, जयश्री संकपाळ, ग्रामविकास अधिकारी व्ही. आर. चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Savitri Chavan as Talsande Deputy Panch