शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

शनिवार पेठेत दोन घरांत घुसून आठ जणांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST

कोल्हापूर : दोन मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू असताना, एकमेकांकडे खुनशी नजरेने पाहिल्याच्या कारणास्तव दोन गटांत वाद उफाळला. हल्लेखोरांनी दोघांच्या ...

कोल्हापूर : दोन मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू असताना, एकमेकांकडे खुनशी नजरेने पाहिल्याच्या कारणास्तव दोन गटांत वाद उफाळला. हल्लेखोरांनी दोघांच्या घरात घुसून काठ्या, लोखंडी गजाने आठ जणांना बेदम मारहाण केली. परिसरातील १२ दुचाकी व एका रिक्षाची मोडतोड करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. ही घटना रविवारी रात्री उशिरा शनिवार पेठेतील गवळी गल्लीत घडली. हल्ल्यात आठ जण जखमी झाले असून, दहा जणांवर गुन्हा नोंद झाला.

जखमींची नावे अशी : दिलीप विष्णुपंत गवळी (५८), त्यांची पत्नी सुनीता गवळी, मुलगा निखिल गवळी, स्वयंम गजानन गवळी (१९), गायत्री गजानन गवळी, सुरेश बळवंतगवळी, आक्काताई गवळी, प्रणाली विक्रम मोतीपुरे (सर्व रा.गवळी गल्ली).

गुन्हा दाखल संशयितांची नावे : हर्ष घोटणे, प्रसाद काळे, श्रावण गजगेश्वर, यश घोटणे, अभिषेक काळे (सर्व रा.शनिवार पेठ), तसेच अनोळखी ४ ते ५ जण.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, न्यू सम्राट चौक तरुण मंडळ व जोशी गल्लीतील संरक्षण तरुण मंडळांच्या गणेशमूर्तींचे रविवारी सायंकाळी विसर्जन सुरू होते. यावेळी स्वयंम गवळी आणि संरक्षण मंडळाचा कार्यकर्ता श्रावण गजगेश्वर यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला. काहींनी मध्यस्थीने वाद मिटविला. रात्री उशिरा त्याच वादाचे पडसाद उमटले. संशयितांनी दिलीप गवळी याच्या घरात घुसून काठ्या व गजाने दिलीप गवळी, पत्नी सुनीता, मुलगी प्रणाली व पुतण्या स्वयंम, निखिल यांना मारहाण केली.

हल्लेखोरांनी सुरेश गवळी याच्या घरावरही हल्ला केला. गवळी याच्यासह त्यांची आई आक्काताई गवळी यांनाही मारहाण केली.

हल्लेखोरांनी दहशतीसाठी परिसरातील १२ दुचाकी व एका रिक्षांची मोडतोड केली. हल्ल्यात दोन घरांतील आठ जण जखमी झाले.

या प्रकरणी दिलीप गवळी यांच्या तक्रारीवरून सोमवारी लक्ष्मीपुरी पोलिसांत दहा जणांवर गुन्हा दाखल झाला, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.