शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील यांची वक्तव्ये वैफल्यातून

By admin | Updated: May 13, 2015 00:52 IST

धनंजय महाडिक यांचे प्रत्युत्तर : पाचगावचा पाणीप्रश्न आम्हीच सोडविला; महाडिकांच्या क्षमतेवर बोलणे हास्यास्पद

कोल्हापूर : विधानसभेसह गोकुळ व राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत जनाधार गेल्यानेच सतेज पाटील वैफल्यातून वक्तव्ये करत असल्याचे प्रत्युत्तर खासदार धनंजय महाडिक यांनी दिले आहे. रविवारी पाचगावच्या पाणी योजना पायाभरणी कार्यक्रमात खासदार महाडिक यांनी पाटील यांच्यावर टीका केली. त्यावर सोमवारी सतेज पाटील यांनी महाडिक नावांवर निवडून येऊन दाखवा असे आव्हान दिले. त्यावर महाडिक यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, ‘लोकसभा निवडणुकीत देशात वेगळी परिस्थिती असताना, कोल्हापूरच्या सुज्ञ जनतेने खासदार म्हणून संधी दिली. जनसेवेचे फळ म्हणूनच जनता पाठीशी राहिली. असे असताना, स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी काहीजण मदतीचा डांगोरा पिटत आहेत. खुनशी आणि द्वेषाचे राजकारण करणाऱ्या सतेज पाटील यांना जनतेने खड्यासारखे बाजूला टाकले. सर्वच ठिकाणी पराभव स्वीकारावा लागल्याने, वैफल्यग्रस्त झालेल्या सतेज पाटील यांनी, पक्ष सोडून निवडून दाखवा, असे बालीश वक्तव्य केले आहे. टीका करण्यापूर्वी २००४ साली त्यांना राजकारणात कुणी आणले, याचा विचार करावा. महाडिक गटाचा उमेदवार म्हणून विधानसभेत प्रवेश केलेल्यांनी आता महाडिकांच्या क्षमतेवर बोलणे हास्यास्पद आहे. पाचगाव पाणीपुरवठा योजनेसाठीची तांत्रिक मान्यता १९ डिसेंबर २०१४ रोजी, तर प्रशासकीय मान्यता २ जानेवारी २०१५ रोजी मिळाली आहे. या कालावधीत सतेज पाटील आमदार नव्हते. तरीही खोटे बोलण्याची आणि स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी वाटेल ते वक्तव्य करण्याची सवय असल्याने, आपणच पाचगावची पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याचे ते सांगत आहेत; पण सुज्ञ जनता सर्वकाही जाणते. खासदार म्हणून जिल्ह्याचे प्रश्न मांडण्यासाठी दिल्लीवारी करताना, स्वत:चे हेलिकॉप्टर नसल्याने, विमानाचा वापर करावा लागतो; पण मंत्रिपदावर असताना सतेज पाटील यांचा अनिर्बंध हेलिकॉप्टरचा वापर जनतेने पाहिला. म्हणून जनतेनेच त्यांना जमिनीवर उतरविले. अशा परिस्थितीतही आत्मचिंंतन करण्याऐवजी महाडिकांवर टीका करण्यातच ते धन्यता मानत आहेत. खासदार म्हणून जिल्ह्याचे सर्व प्रश्न लोकसभेच्या अधिवेशनाच्या कालावधीत उपस्थित केले आहेत. संबंधित खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याने त्याला यश येऊ लागले आहे. त्यामुळे सतेज पाटील यांना पोटशूळ उठला आहे. सर्वच पातळ्यांवर पराभूत झाल्याने, सतेज पाटील यांच्याकडे कोणतेच काम उरलेले नाही. त्यांच्या बाष्कळ वक्तव्यांकडे दुर्लक्ष करून, सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आत्मीयतेमुळे अमल महाडिक आमदारअमल महाडिक हे कोणत्या लाटेवर नव्हे, तर महाडिक कुटुंबीयांबद्दलची सर्वसामान्यांची आत्मीयता आणि पाटील यांच्या विरोधातील रोषामुळे आमदार झाले. त्यांनी गेल्या सहा महिन्यांत पाचगाव पाणी योजना मंजूर करून आणली. दक्षिण मतदारसंघातील रस्त्यांसाठी १८ कोटी रुपयांचा निधी आणला.