विक्रेत्याचा खून करून झाला होता पसार, सातारच्या आरोपीस कोल्हापुरात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 11:20 IST2022-08-02T11:18:34+5:302022-08-02T11:20:19+5:30

डोक्यात लोखंडी गज घालून बॉबी विक्रेत्याचा खून करून झाला होता पसार

Satara accused arrested in Kolhapur in salesman murder case | विक्रेत्याचा खून करून झाला होता पसार, सातारच्या आरोपीस कोल्हापुरात अटक

विक्रेत्याचा खून करून झाला होता पसार, सातारच्या आरोपीस कोल्हापुरात अटक

कोल्हापूर : म्हावशी पेठ (ता. पाटण, जि. सातारा) येथे डोक्यात लोखंडी गज घालून बॉबी विक्रेत्याचा खून करून पसार झालेल्या आरोपीला शनिवारी अटक केली. कालियप्पन एस. कंदन (वय ४० रा. म्हावशी, ता. पाटण, जि. सातारा. मूळ रा. मदुराई, जि. मदुराई, तामिळनाडू) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केली.

म्हावशी येथे रमण ऊर्फ आण्णा तेवर या बॉबी विक्रेत्याचा खून शनिवारी करण्यात आला. खुनाची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याची नोंद पाटण पोलीस ठाण्यात झाली होती. याप्रकरणातील संशयित आरोपी कालियप्पन कंदन हा पळून कोल्हापूरला आल्याची माहिती सातारा पोलिसांकडून प्राप्त झाली. त्यानुसार कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे त्याला राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीच्या पुलाजवळ पीर बालेसाहेब बाबा दर्ग्याजवळ पकडले. त्याला पाटण पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Satara accused arrested in Kolhapur in salesman murder case