विवेकानंद कॉलेजच्या सार्थक जाधव याचे ‘जेईई’मध्ये धवल यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST2021-09-23T04:28:31+5:302021-09-23T04:28:31+5:30

विवेकानंद कॉलेजचे विदयार्थी सर्व ज्ञानक्षेत्रात, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करतात. सार्थक याने व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षेत मिळवलेले हे ...

Sarthak Jadhav of Vivekananda College's white success in 'JEE' | विवेकानंद कॉलेजच्या सार्थक जाधव याचे ‘जेईई’मध्ये धवल यश

विवेकानंद कॉलेजच्या सार्थक जाधव याचे ‘जेईई’मध्ये धवल यश

विवेकानंद कॉलेजचे विदयार्थी सर्व ज्ञानक्षेत्रात, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करतात. सार्थक याने व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षेत मिळवलेले हे यश कौतुकास्पद आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे डॉ. कुंभार यांनी सांगितले. या विवेकानंद कॉलेजच्या वाणिज्य विभागात माझे शिक्षण झाले. माझी अभ्यासात फारशी प्रगती नव्हती, पण येथील शिक्षकांनी मला समजून घेत मार्गदर्शन केले. त्यांनी जीवनाला दिशा देण्याचे काम केल्यानेच मी यश मिळवू शकलो, असे सार्थक याने सांगितले. सविता जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. अरुण पोवार, बी. एस. लाड, अशोक पाटील, प्रबंधक सी. बी. दोडमणी उपस्थित होते. प्रा. भिकाजी लाड यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शिल्पा भोसले यांनी आभार मानले.

फोटो (२२०९२०२१-कोल-सार्थक जाधव (सत्कार) : कोल्हापुरात बुधवारी जेईई परीक्षेत यश मिळविणाऱ्या सार्थक जाधव याचा सत्कार विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी केला. यावेळी शेजारी सविता जाधव यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते.

220921\22kol_6_22092021_5.jpg

फोटो (२२०९२०२१-कोल-सार्थक जाधव (सत्कार) : कोल्हापुरात बुधवारी जेईई परीक्षेत यश मिळविणाऱ्या सार्थक जाधव याचा सत्कार विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी केला. यावेळी शेजारी सविता जाधव यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Sarthak Jadhav of Vivekananda College's white success in 'JEE'