शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘सरसेनापती’ने ऑक्सिजन प्रकल्पातून माणुसकी निभावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सेनापती कापशी : कोरोनाच्या महामारीवेळी राज्याला ऑक्सिजनची असलेली गरज ओळखून मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या खासगी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सेनापती कापशी : कोरोनाच्या महामारीवेळी राज्याला ऑक्सिजनची असलेली गरज ओळखून मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या खासगी कारखान्यावर ऑक्सिजन प्रकल्प उभारून रुग्णांना नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे. संकटसमयी रयतेच्या संरक्षणासाठी धावून जाणाऱ्या सरसेनापती संताजी घोरपडे यांचा पराक्रम सांगणाऱ्या या कारखान्याने खऱ्या अर्थाने माणुसकीचा धर्म निभावल्याचे गौरवोद्गार राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काढले.

ते बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उभारलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

मंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, कोरोना महामारीत सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने अनंत अडचणींवर मात करून उभारलेला हा प्रकल्प राज्यातील अन्य साखर कारखाने व सहकारी संस्थांसाठी आदर्शवत ठरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने हाती घेतलेला हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी आहे. कारखान्याने दीड कोटी रुपये खर्चून हा अत्याधुनिक ऑक्सिजन प्रकल्प उभारला आहे. प्रति तास ४१ किलोप्रमाणे, दररोज एकूण एक हजार किलो ऑक्सिजन निर्मिती क्षमता आहे. शुद्धतेचे प्रमाण तब्बल ९५ टक्के असलेल्या वैद्यकीय वापरासाठी उपयुक्त या प्रकल्पामधून दररोज शंभर जंबो सिलिंडर भरली जाणार आहेत.

स्वागत कार्यकारी संचालक संजय शामराव घाडगे यांनी केले तर प्रास्ताविक अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले. यावेळी भैय्या माने, युवराज पाटील, गणपतराव फराकटे, शशिकांत खोत, विकास पाटील, सूर्याजी घोरपडे, कारखान्याचे सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

फोटो:- बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भैय्या माने, युवराज पाटील, गणपतराव फराकटे, नवीद मुश्रीफ आदी उपस्थित होते. फोटो - संदीप तारळे, गलगले