संजयसिंह चव्हाण जिल्हा परिषदेचे नवे सीईओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST2021-01-21T04:23:21+5:302021-01-21T04:23:21+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची लातूर महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी ...

संजयसिंह चव्हाण जिल्हा परिषदेचे नवे सीईओ
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची लातूर महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी संजयसिंह चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी दुपारनंतर हे बदलीचे आदेश निघाले.
संजयसिंह चव्हाण हे मूळचे भोळी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील असून, १९९१ मध्ये सहायक कायदा अधिकारी म्हणून त्यांची मंत्रालयीन कामकाजासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवड झाली. १९९३ मध्ये ते उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर त्यांनी प्रांताधिकारी, गडहिंग्लज, इचलकरंजी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, पुणे आदीसह विविध पदांवर काम केले. ३ सप्टेंबर २०२० च्या अधिसूचनेव्दारे त्यांची भारतीय प्रशासन सेवेसाठी निवड झाली. त्यानंतर त्यांची प्रकल्प संचालक, जलस्वराज्य प्रकल्प, नवी मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये आता बदल करून त्यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोट
कोल्हापुरात मला खूप शिकायला मिळाले. आपल्या गावातील विकासकामे व्हावीत, यासाठी कार्यकर्ते किती सातत्याने प्रयत्न करतात, ते पहावयास मिळाले. कोल्हापूर जिल्हा परिषदही सातत्याने वेगवेगळ्या बाबतीत अग्रेसर आहे. या परंपरेमध्ये मला काम करण्याची चांगली संधी मिळाली.
अमन मित्तल
२००१२०२१ कोल संजयसिंह चव्हाण