संजय शिंदे रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST2021-02-05T06:58:29+5:302021-02-05T06:58:29+5:30
कोल्हापूर : येथील पूर्व निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची शुक्रवारी रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीवर नियुक्ती झाली आहे. ...

संजय शिंदे रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी
कोल्हापूर : येथील पूर्व निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची शुक्रवारी रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीवर नियुक्ती झाली आहे.
मूळचे सातारा कोरेगाव येथील असलेले संजय शिंदे यांनी कोल्हापुरात पुरवठा अधिकारी म्हणून तीन वर्षे काम केले. नंतर त्यांची सांगली येथे एक वर्ष बदली झाली. त्यानंतर ते पुन्हा कोल्हापुरात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. ही जबाबदारी त्यांनी तीन वर्षे सांभाळली. कोरोना काळात त्यांनी कोणतेही पद नसताना समन्वयक म्हणून काम केले. जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून रुग्ण संख्या, हॉस्पिटलमधील स्थिती, डाटा संकलन, विविध विभागांना निर्देश, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही पार पाडणे, ही जबाबदारी त्यांनी सहा महिने पार पाडली. अखेर त्यांची पदोन्नतीवर रत्नागिरी येथे बदली झाली.
--
फोटो नं २९०१२०२१-कोल-संजय शिंदे (बदली)
--