शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
3
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
4
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
5
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
6
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
7
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
8
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
9
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
10
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
11
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
12
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
13
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
14
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
15
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
16
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
17
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
18
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
19
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
20
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव

Kolhapur Crime: नोटांऐवजी पाठवले कोऱ्या कागदांचे बंडल; सांगलीच्या व्यापाऱ्याची ५० लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:20 IST

शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा

कोल्हापूर : व्यापारासाठी दिल्लीत तुमच्या मित्रांकडून मला ५० लाख रुपये पाठवा. मी तुम्हाला कोल्हापुरातून पैसे पोहोचवतो, असे म्हणत तीन अनोळखी व्यक्तींनी सांगलीतील बेदाणे व्यापारी राजेश लक्ष्मीनारायण मुंदडा (वय ५४, रा. अंबाईनगर, सांगली) यांना ४९ लाख ९० हजारांचा गंडा घातला.खऱ्या नोटांखाली त्याच आकाराचे कोरे कागद ठेवून त्यांनी फसवणूक केली. हा प्रकार सात ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एलेक्झा टॉवरमध्ये घडला. मुंदडा यांच्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी बुधवारी (दि. २०) तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीतील बेदाणे व्यापारी मुंदडा यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राहुल नावाच्या व्यक्तीने मोबाइलवर कॉल केला. दिल्लीतून बोलत असल्याचे सांगत त्याने बेदाणे खरेदीच्या बहाण्याने ओळख वाढवली. त्यानंतर व्यापारासाठी दिल्लीत ५० लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. दिल्लीतील तुमच्या व्यापारी मित्रांकडून ५० लाख द्यायची व्यवस्था करा. मी तुम्हाला कोल्हापुरातील मित्राकडून ५० लाख रुपये द्यायची व्यवस्था करतो, असे त्याने सांगितले.मुंदडा यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून दिल्लीतील एका व्यापारी मित्राकडून ५० लाखांची रोकड पोहोचवली. त्याच दिवशी दुपारी साडेतीनच्या कोल्हापुरातील एलेक्झा टॉवर येथे एका व्यक्तीकडून ५० लाख घेण्यास सांगितले. त्याचा मोबाइल नंबरही दिला.ठरल्यानुसार मुंदडा यांचे कर्मचारी पैसे घेण्यासाठी कोल्हापुरात पोहोचले. त्यांनी एलेक्झा पार्कमध्ये एका व्यक्तीकडून पैसे घेतले. सर्व रोकड प्लास्टिकच्या कागदात बांधली होती. कागद बाजूला सारून बँकेचा शिक्का असलेल्या पावतीसह बंडल एकत्र बांधल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर रक्कम घेऊन कर्मचारी सांगलीत पोहोचले. व्यापारी मुंदडा यांनी नोटांचे बंडल काढून पाहिले असता, त्यात कोरे कागद असल्याचे आढळले.मोबाइल नंबरवरून शोधपैशांची मागणी करण्यासाठी आलेल्या मोबाइल नंबरवरून संशयितांची माहिती काढण्याचा प्रयत्न मुंदडा यांनी केला. मात्र, पैसे दिल्यापासून तिन्ही मोबाइल नंबर स्विच ऑफ झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी १४ दिवसांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

सीसीटीव्ही फुटेजवरून शोधफसवणुकीत वापर झालेल्या तीन मोबाइल नंबरची माहिती काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. हे तिन्ही नंबर सध्या बंद आहेत. कोऱ्या कागदांच्या नोटांचे बंडल देणारी व्यक्ती एलेक्झा टॉवर येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. तिचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.