शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

समीरचा गौप्यस्फोट हा अतिरेक : संजयकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2015 00:54 IST

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी) संजयकुमार

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याने केलेल्या गौप्यस्फोट हा त्याचा अतिरेक आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्या गौप्यस्फोटाची सखोल चौकशी करण्याचे आदेश तपास अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांना दिले आहेत. त्यानुसार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू आहे. हा चौकशी अहवाल न्यायालयात सादर केला जाईल, असे राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी) संजयकुमार यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गायकवाड याने न्यायालयीन कोठडीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केलेल्या गौप्यस्फोटाची दखल घेऊन अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार ९ आॅक्टोबरला ब्रेन मॅपिंग सुनावणीसाठी कसबा बावडा येथे न्यायालयात समीरसोबतच्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू आहे. याबाबत संजयकुमार म्हणाले, ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी समीरला २५ लाख रुपयांची आॅफर देण्याचा काहीच संबंध नाही. या चाचणीमध्ये तो दोषी निघेलच असे नाही. त्याला प्रत्येक गोष्टीत अतिरेक करण्याची सवय आहे; परंतु त्याच्या गौप्यस्फोटाची चौकशी करून अहवाल न्यायालयास सादर होईल.