माहिती उपसंचालकपदी संभाजी खराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST2021-09-24T04:27:39+5:302021-09-24T04:27:39+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर विभागाच्या माहिती उपसंचालकपदाचा कार्यभार गुरुवारी डॉ. संभाजी खराट यांनी स्वीकारला. यावेळी त्यांनी प्रशासकीय कामकाज अधिक ...

Sambhaji Kharat as Deputy Director of Information | माहिती उपसंचालकपदी संभाजी खराट

माहिती उपसंचालकपदी संभाजी खराट

कोल्हापूर : कोल्हापूर विभागाच्या माहिती उपसंचालकपदाचा कार्यभार गुरुवारी डॉ. संभाजी खराट यांनी स्वीकारला. यावेळी त्यांनी प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख करा, अशा सूचना केल्या. खराट यांनी यापूर्वी मुंबई, कोल्हापूर, कोकण भवन, रत्नागिरी, ठाणे, मंत्रालय याठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी तसेच वरिष्ठ सहायक संचालक पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. पत्रकारितेत पीएच.डी. केली असून, त्यांची २५ पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत.

यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, सहायक संचालक फारुख बागवान, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, माहिती सहायक एकनाथ पोवार, अमोल पाटील, सतीश शेंडगे, रोहित माने, सचिन वाघ, सतीश कोरे, अनिल यमकर, साक्षी मोरे, दामू दाते, प्रकाश पाटील, रावसाहेब पाटील, प्रकाश चव्हाण, स्वप्नाली कुंभार आदी उपस्थित होते. खराट म्हणाले, शासकीय कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना नम्रपणे व सौजन्याची वागणूक देणे गरजेचे आहे. प्रत्येक विषय समजून घेऊन जनहित जोपासा.

---

फोटो नं २३०९२०२१-कोल-संभाजी खराट

---

Web Title: Sambhaji Kharat as Deputy Director of Information