समरजित घाटगेंनी घेतला गोकुळ, जिल्हा बँक स्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST2021-02-05T06:56:23+5:302021-02-05T06:56:23+5:30

कोल्हापूर : भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी मंगळवारी गाेकुळ आणि जिल्हा बँक निवडणूक जाहीर झाल्यास पक्षाची काय ...

Samarjit Ghatge took stock of the situation in Gokul, District Bank | समरजित घाटगेंनी घेतला गोकुळ, जिल्हा बँक स्थितीचा आढावा

समरजित घाटगेंनी घेतला गोकुळ, जिल्हा बँक स्थितीचा आढावा

कोल्हापूर : भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी मंगळवारी गाेकुळ आणि जिल्हा बँक निवडणूक जाहीर झाल्यास पक्षाची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक उपस्थित होत्या.

या दोन्ही सहकारी संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होईल अशी परिस्थिती आहे. अशावेळी प्रत्येक तालुक्यात नेमकी काय परिस्थिती आहे याचा घाटगे यांनी आढावा घेतला. कोण उमेदवार असेल तर ठरावांचे गणित काय आहे, याची त्यांनी माहिती घेतली. अजूनही जिल्ह्यातील काही नेत्यांच्या भूमिका अजूनही स्पष्ट झालेल्या नाहीत. एकदा याची स्पष्टता आल्यानंतर या प्रक्रियेला वेग येणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीचाही विषय यावेळी चर्चेत घेण्यात आला. जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल होणार असला तरी उर्वरित कालावधीचा विचार करता याबाबत फारसे कोणी स्वारस्य दाखविले नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, विजय भोजे, अशोकराव माने, प्रसाद खोबरे, राजवर्धन निंबाळकर, महेेश चौगुले, विजया पाटील यावेळी उपस्थित होत्या.

Web Title: Samarjit Ghatge took stock of the situation in Gokul, District Bank