शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

२६/११ च्या वीरांना सलाम

By admin | Updated: November 27, 2015 01:05 IST

शिवाजी विद्यापीठात कँडल मार्च : विद्यार्थ्यांची व्यसनमुक्तीची शपथ

कोल्हापूर : तुमच्या अशा भ्याड हल्ल्यांना आम्ही कधीच घाबरणार नाही, दहशतवादी तुम्ही कधीच जिंकणार नाही, अशा घोषणा देत मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या वीरांना गुरुवारी शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढून आदरांजली वाहिली. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याला गुरुवारी सात वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त गुरुवारी शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी सायंकाळी मुलींच्या वसतिगृहापासून कँडल मार्च काढत मुख्य इमारतीसमोर आले. इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या २६/११च्या रांगोळीभोवती मेणबत्या प्रज्वलित करीत शहिदांना श्रद्धांजली वाहिली. याठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्तीची शपथ दिली, तर या देशाचा नागरिक म्हणून देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व अखंड ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन, अशीही शपथ घेत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकजुटीचे दर्शन घडविले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ‘भारत माता की जय’च्या घोषणाने परिसर दुमदुमला.विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभाग व वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागांच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, ए. आय. यू. चे सरचिटणीस प्रा. फुरकान कमर, बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एच. महेशप्पा, ए. आय. यू.चे सहसचिव सॅमसन डेव्हिड, सहसचिव वीणा भल्ला, डॉ. रमा देवी पाणी, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. मास कम्युनिकेशनच्या समन्वयक डॉ. निशा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कँडल मार्च काढण्यात आला. याप्रसंगी विविध अधिविभागप्रमुख, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुलींच्या वसतिगृहापासून कँडल मार्चला सुरुवातमुख्य इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या रांगोळीभोवती मेणबत्या प्रज्वलित करीत शहिदांना श्रद्धांजलीयाठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्तीची शपथ विद्यार्थांनी एकजुटीचे घडविले दर्शन;‘ भारत माता की जय’च्या घोषणाने परिसर दुमदुमला