शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

सागरोबा देवाच्या दर्शनासाठी गर्दी, सागरमाळ येथे म्हशीचा ‘फॅशन शो’

By admin | Updated: November 2, 2016 00:52 IST

नागरिकांनी मोठी गर्दी केली

कोल्हापूर : म्हशींच्या गळ््यात माळा, पायात चांदीचे पैंजण, शिंगांमध्ये मोरपिसारा, पाठीच्या केसांवर कोरीव काम करून सजविलेल्या म्हशी, मालकांच्या हाकेसरशी आणि मोटारसायकलच्या आवाजावर मागे धावणाऱ्या म्हशी पाहण्यासाठी सागरमाळ येथे मंगळवारी सायंकाळी नागरिकांनी मोठी गर्दी केली, निमित्त होते भाऊबिजेनिमित्त सागरोबा देवाच्या दर्शनाचे. भाऊबिजेदिवशी सम्राटनगर येथील सागरमाळ येथील सागरोबा देवाच्या दर्शनासाठी म्हशीसोबत नेत देवाला अभिषेक घालण्याची जुनी परंपरा आहे. दर्शन घेतल्यानंतर वर्षभर म्हशी विविध स्पर्धेत सहभाग होतात, अशी खूप जुनी पद्धत आहे. ही परंपरा जपण्यासाठी मंगळवारी मालकांची पावले सागरमाळाकडे वळू लागली. दुपारी साडेतीननंतर अनेक मालक आपल्या म्हशीसोबत ठेवणीतील कपडे घालून, खांद्यावर लाल रूमाल, हातात काठी घेऊन हलगीच्या कडकडात वाजत-गाजत या ठिकाणी सहभागी होत होते. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रंकाळा टॉवर, गंगावेश, जुना बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, गवळ गल्ली, दौलतनगर, मोरेवाडी, पाचगांव, कंदलगाव, कळंबा आदी परिसरातून दूध व्यावसायिक आपल्या सजविलेल्या म्हशीसह या ठिकाणी येत होते. दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी नंतर म्हशीचा अनोखा ‘फॅशन शो’ रंगला. या ठिकाणी मालकाच्या मोटारसायकल आवाजाच्या इशाऱ्यावर वमालकाच्या एका हाकेवर धावणाऱ्या म्हशी पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी काहीजणांनी मागील दोन पायांवर उभा राहणाऱ्या म्हशीच्या अनोख्या कसरती करून दाखवून उपस्थितांना अचंबित केले, तर काही लहान मुले आपल्या म्हशीच्या पाठीवर उभे राहून नाचत होती. कोल्हापूर जिल्हा म्हैसधारक व दुग्ध व्यवसाय संघटनेच्यावतीने प्रत्येक म्हैसमालकांचा पान-विडा, टोपी व नारळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक यांनी याठिकाणी भेट दिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विलास केसरकर, उपाध्यक्ष संजय करंबे, पिंटू भोसले, युवराज बचाटे, विजय चौगले, राजू करंबे, हरिभाऊ पायमल, गोगा पसारे, सुनील आडगुळे यांच्यासह ग्रामीण भागासह शहरातील दूध व्यावसायिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)