शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

पोटाच्या खळगीने दाखविली ऊसतोडीची वाट !

By admin | Updated: November 21, 2015 00:16 IST

अल्पवयीन ऊसतोड कामगार : गगनाला भिडणाऱ्या महागाईत अनेक समस्यामुळेच पेनऐवजी हातात कोयता

दत्तात्रय पाटील- म्हाकवे --उद्या मी डॉक्टर, वकील, शिक्षक, इंजिनिअर होऊन मोठा पगार घेईन, समाजात माझे नावही होईल, गाडी, बंगलाही असेल; पण पोटाच्या खळग्यात आज अन्नाचे कण गेले, तरच या स्वप्नांना पंख मिळेल. मग तुम्हीच सांगा, आजच्या पोटापाण्याची व्यवस्था कुठून करायची? हाता-तोंडाची गाठभेट होणे मुश्कील असताना गगनाला भिडणाऱ्या महागाईत शिक्षणाचा ‘शिवधनुष्य’ पेलायचा कसा, अशा एक ना अनेक समस्यामुळेच पेनऐवजी हातात कोयते घेऊन ऊसतोडणीची पायवाट तुडवावी लागत आहे, अशी दिनवाणी व्यथा अल्पवयीन ऊसतोड मजुरांकडून उसाच्या फडात ऐकायला मिळत आहे.ऊसदराच्या आंदोलनासह ऊसतोड मजुरांचे दरवाढ, मजुरीवाढ यासाठी असणारे आंदोलन निवळले आहे. त्यामुळे बीड, परभणी, जालना, आदी विदर्भ-मराठवाड्यासह कर्नाटकातील ऊसतोड मजुरांचे तांडे जिल्ह्यात दाखल झाले आहेत.या ऊसतोड मजुरांसोबत लहान-सहान मुलेही आली आहेत, तर अनेक टोळ्यांमध्ये अल्पवयीन, मधेच शाळा सोडलेले, तर शाळेची पायरीच चढलेले नाही अशा मजुरांचा समावेश आहे. त्यामुळे सक्तीचे प्राथमिक शिक्षण, बालमजुरी रोखणारा कायदा पोटासाठी आलेल्या या अल्पवयीन मुलांच्या दृष्टीने कुचकामी, केवळ कागदावरच राहणार आहे.सध्या प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले आहे. तसेच गरीब मुलांना गणवेश, मध्यान्ह भोजनही दिले जाते. तरीही ऊसतोड मजुरांच्या मुलांचे मन शाळेत का रमत नाही, याबाबत अधिक खोलात जाऊन माहिती घेतली असता असे दिसून आले की, शिक्षण मोफत मिळेल, दुपारचे थोडेफार जेवणही मिळेल; पण सकाळ आणि सायंकाळच्या जेवणाची व्यवस्था कोठून करायची. तसेच काही अल्पवयीन मुलांवर तर लहान भावंडांसह वयोवृद्ध आई-वडिलांचीही जबाबदारी असते. त्यामुळे या मुलांना ऊसतोड केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे ही मुले उज्ज्वल भविष्याचा विचार करतील कशी? हा सर्वांनाच अनुत्तरीय करणारा प्रश्न आहे. त्याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. गरिबी, शैक्षणिक अंधकार आ वासून उभा असताना देशाने महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणे कितपत योग्य आहे, याचेही आत्मपरीक्षण झालेलेच बरे.