शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एस. चैतन्य कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक

By admin | Updated: May 14, 2015 01:09 IST

अंकित गोयल वर्ध्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक

कोल्हापूर : कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची वर्धा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी, तर इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक एस. चैतन्य यांची कोल्हापूर अप्पर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नतीने बढती झाली. राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाच्या मंजुरीनंतर बुधवारी रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आले. त्यामध्ये कोल्हापूरचे अंकित गोयल यांची वर्धा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी तर इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक एस. चैतन्य यांची अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली. गोयल यांचे मूळ गाव इंदोर (मध्यप्रदेश) ते बी. ई. इलेक्ट्रॉनिक असून, २०१० मध्ये ते पोलीस दलामध्ये रूजू झाले. २०१२ मध्ये त्यांची अमरावतीमधील चांदूर रेल्वे सहाय्यक पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली. याठिकाणी त्यांनी चांगली कामगिरी केल्यामुळे पदोन्नतीने कोल्हापूरच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली. २५ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांनी कोल्हापूरचा पदभार स्वीकारला. त्यांनी एक वर्षाच्या कालावधीमध्ये लोकांच्या सेवेसाठी त्यांनी अहोरात्र काम केले. गोरगरीब लोकांना योग्य न्याय देण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला तसेच गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का व हद्दपार अशा गंभीर स्वरुपाच्या कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविले. गणेशोत्सव, टोल आंदोलन त्यांनी चांगल्याप्रकारे हाताळली. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती. या तपासात त्यांनी २४ तास झोकून देत मारेकऱ्यांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य हे दोन वर्षांपूर्वी नांदेडहून कोल्हापुरात आले. त्यानंतर इचलकरंजी विभागातील गुन्हेगारांना ‘सळो की पळो’ करून सोडले. अवैध व्यावसायिकांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. त्यांनी अत्यंत कमी वयात चांगले काम करून दाखविले. गोयल यांच्याकडील पानसरे हत्येचा तपास त्यांच्याकडे सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी‘कोल्हापूरमध्ये काम करताना शिकायला खूप मिळाले. येथील सामाजिक, भौगोलिक व राजकीय परिस्थितीची चांगली ओळख झाली. या एक वर्षाच्या कालावधीमध्ये चांगले काम करून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. - अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक