शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांनी कमावले, विरोधकांनी गमावले !

By admin | Updated: June 1, 2015 00:11 IST

गडहिंग्लज अर्बन बँक निवडणूक : ‘लोकमत’ने मांडली बिनविरोध निवडणुकीची भूमिका; अभिनंदनाचा वर्षाव

राम मगदूम - गडहिंग्लज -अपेक्षेप्रमाणे गडहिंग्लज अर्बन बँकेची निवडणूक अखेरीस बिनविरोध झाली. या बहुचर्चित निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी ‘कमावले’, तर विरोधकांनी ‘गमावले’ अशी स्थिती आहे. बँकेच्या भल्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, हीच भूमिका ‘लोकमत’ने सुरुवातीपासून घेतली होती. त्यास दाद मिळाली. निवडणूक बिनविरोध होण्यात विधायक भूमिका बजावल्याबद्दल ‘लोकमत’वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.१९५० मध्ये स्थापन झालेल्या या बँकेने सीमाभागात नावलौकिक असणाऱ्या गडहिंग्लज बाजारपेठेच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे समस्त गडहिंग्लजकरांची ‘अस्मिता’ बनलेल्या या बँकेची निवडणूक बिनविरोध करावी, अशीच भूमिका सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंंतकांची होती. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीला आक्षेप असणाऱ्या बँकेच्या काही ‘हितचिंतकांनी’ त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. ‘बँक बचाव’चे आवाहन करीत विरोधी परिवर्तन पॅनेलने मोर्चेबांधणी केली.निवडणूक लागून आरोप-प्रत्यारोप झाल्यास ठेवीदार विचलित होतील आणि त्यांचा बँकेच्या सांपत्तिक स्थितीवर परिणाम होईल म्हणून तडजोडीचे प्रयत्न सुरू झाले. आमदार हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर यांनीही दोन्ही बाजूच्या मंडळींना सबुरीचा सल्ला दिला. बिनविरोधाच्या हालचालींना गती मिळाली.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रत्नमाला घाळी यांनीही यात पुढाकार घेतला. डॉ. नंदिनी बाभूळकर, उदयराव जोशी, किशोर हंजी, सुकाणू समितीचे शिवगोंडा पाटील, कृष्णाप्पा मुसळे, नागाप्पा कोल्हापुरे, हरिभाऊ चव्हाण, आदींच्या प्रयत्नाने निवडणूक बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाले.तथापि, आपल्या वाट्याला आलेल्या चार जागांवर कुणाला पाठवायचे यावर एकमत न झाल्यामुळे विरोधकांना माघार घ्यावी लागली. चार जाणती मंडळी संचालक मंडळावर पाठवून कारभारात सहभागी होण्याची आणि चुकीचा कारभार होत असल्यास त्यावर अंकुश ठेवण्याची संधी विरोधकांनी गमावली आहे. सध्या बँकेत १६० कोटींच्या ठेवी आहेत. मुख्यालयासह गडहिंग्लजला १, कडगावला १, कोल्हापुरात ३ व जयसिंगपुरात १, अशा सहा शाखा आहेत. मात्र, बँकेचे वयोमान लक्षात घेता अपेक्षित शाखा विस्तार झालेला नाही. शाखा विस्ताराबरोबरच व्यवसायवृद्धीसाठीही नियोजनपूर्वक प्रयत्न करायला हवेत. अलीकडे राष्ट्रीयीकृत, सहकारी व खासगी बँकेच्या स्पर्धेमुळे बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. बदलत्या काळाची आव्हाने पेलण्याची क्षमता विकसित करण्याबरोबरच एटीएम, एसएमएस व इंटरनेट बँकिंग, आदी अत्याधुनिक सुविधाही ग्राहकांना उपलब्ध करून द्यायला हव्यात.कारभाराची संधी; पण जबाबदारीही वाढलीअमृतमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या बँकेच्या यशात संस्थापक अध्यक्ष शिवपुत्राप्पा दड्डी यांच्यापासून विद्यमान अध्यक्ष रवींद्र आजरी आणि पहिले व्यवस्थापक गुरुसिद्धाप्पा गाडवी यांच्यापासून विद्यमान सरव्यवस्थापक किरण तोडकर आणि सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यात कर्मचाऱ्यांचेही बहुमोल योगदान असल्यामुळे त्यांचा ‘सन्मान’देखील जपायला हवा. पुन्हा एकहाती कारभाराची संधी मिळाल्याने सत्ताधाऱ्यांनी ‘कमावले’ असले तरी त्यांची जबाबदारीही वाढली आहे.