शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाविना मराठ्यांच्या पिढ्या बरबाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST

आजरा : राजकारण्यांच्या तिढ्यामुळे आरक्षणाविना मराठ्यांच्या पिढ्या बरबाद होत आहेत. यापुढे मराठा आरक्षण खेचून आणण्यासाठी मराठा समाजाने एकत्रित काम ...

आजरा :

राजकारण्यांच्या तिढ्यामुळे आरक्षणाविना मराठ्यांच्या पिढ्या बरबाद होत आहेत. यापुढे मराठा आरक्षण खेचून आणण्यासाठी मराठा समाजाने एकत्रित काम करण्याची गरज आहे. गरज पडल्यास दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची तयारी ठेवा, असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.

आजऱ्यातील मराठा समाजाच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आजरा तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष मारुती मोरे यांनी मराठा महासंघाच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, आजरा तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हण, उपाध्यक्ष बंडोपंत कातकर, कार्याध्यक्ष संभाजी इंजल, सरचिटणीस प्रकाश देसाई, महिलाध्यक्षा रचना होलम, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष सुधीर ऊर्फ आप्पा शिवणे, कार्याध्यक्ष किरण डोमणे, भुदरगडचे तालुकाध्यक्ष आनंदा चव्हाण, कार्याध्यक्ष सूर्यकांत चव्हाण, चंदगडचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. जितेंद्र मुळीक, कार्याध्यक्ष प्रमोद चोथे यांचा सत्कार करण्यात आला. मराठा महासंघाने राज्यात ३०० पैकी जवळपास १७० तालुक्यांत नवीन संघटन तयार केले आहे. यापुढील काळात गोवा व कर्नाटकमध्येही मराठा संघटन बांधणार असल्याचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे यांनी सांगितले.

मेळाव्यास अवधूत पाटील, सुहास निंबाळकर, कृष्णा हारगुडे, शिवणे गुरुजी यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. अशोक बाचूळकर यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी इंजल यांनी आभार मानले.

-----------------------------

* फोटो ओळी : आजऱ्यातील मराठा महासंघाच्या मेळाव्यात राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मार्गदर्शन केले.

क्रमांक : २७०१२०२१-गड-०९